शतकातील दुसऱ्या क्रमांकाचे दीर्घकाळ दिसणारे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबरला, या भागातून दिसणार ग्रहण

the-second-largest-lunar-eclipse-of-the-century-will-take-place-on-november-19-eclipse-will-be-seen-only-in-this-part-of-india-news-update
the-second-largest-lunar-eclipse-of-the-century-will-take-place-on-november-19-eclipse-will-be-seen-only-in-this-part-of-india-news-update

नवी दिल्ली: शतकातील सर्वात दिर्घकाळ चालणाऱ्या चंद्रग्रहणांपैकी एक चंद्रग्रहण  शुक्रवारी १९ तारखेला बघायला मिळणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हे चंद्रग्रहण सकाळी ११.३४ मिनीटांनी सुरु होणार असून संध्याकाळी ५ वाजुन ३३ मिनीटांनी संपणार आहे. तेव्हा अरुणाचल प्रदेश आणि आसाम या ईशान्य भागातून अगदी काही मिनीटे ग्रहाणाचा कालावधी संपण्याच्या काळात हे खंडग्रास प्रकारात चंद्रग्रहण दिसणार आहे.

विजयवाडा, नागपूर, अमृतसर या पट्ट्याच्या पूर्व भागात पौर्णिमेचा चंद्र हा काहीसा अंधूक झालेला दिसेल. या परिस्थितीला खगोलीय भाषेत penumbra lunar eclipse स्थिती असं म्हणतात. पण या भागात दिवस असल्याने आणि ग्रहणाचा कालावधी सरत असल्याने हा प्रभावही फारसा अनुभवता येणार नाही. तर उर्वरीत भारतात हे चंद्रग्रहण दिसणार नाही.

चंद्रग्रहण सुरु होण्यासून संपेपर्यंत असा सुमारे सहा तासांचा एकुण कालावधी आहे, तर ग्रहण दिसणाऱ्या ठिकाणाहून ते जास्तीत जास्त तीन तास एवढं दीर्घकाळ दिसणार आहे. शतकात होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या कालावधींपैकी १९ नोव्हेंबरला होणाऱ्या चंद्रग्रहणाचा कालावधी हा दुसऱ्या क्रमाकांचा कालावधी असणार आहे.

या चंद्रग्रहणाची सुरुवात ही साधारण उत्तर गोलार्धात असणाऱ्या ग्रीनलँड, आईसलँड या देशांपासून होणार असून मग संपुर्ण उत्तर अमेरिका ( अमेरिका , कॅनडा ), दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, पॅसिफिक महासागर, जपान, ऑस्ट्रेलियाचा ईशान्य भाग, चीन आणि रशियाचा पूर्वेकडचा भाग अशी या चंद्रग्रहणाची व्याप्ती असणार आहे.

अमेरिका, कॅनडा आणि पॅसिफिक महासागर इथून खग्रास चंद्रग्रहण बघता येईल, खऱ्या अर्थाने चंद्रग्रहणाचा आनंद लुटता येणार आहे. सुमारे ३ तास चंद्रग्रहणाची स्थिती अनुभवता येणार आहे.

चंद्रग्रहण ही एक पुर्णपणे खगोलीय घटना आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण अनुभवायला मिळते. अनेकदा हे तिघंही बरोब्बर सरळ रेषेत नसतात, तर अनेकदा चंद्र हा त्याच्या काहीशा लंबवर्तुळाकार कक्षेमुळे पृथ्वीपासून खूप दूर असतो किंवा सर्वात जवळ येतो.

या सर्वांमुळे चंद्रग्रहणाच्या स्थितीवर, कालावधीवर फरक पडत असतो. २१ व्या शतकात एकुण २२८ विविध चंद्रग्रहणे होणार आहेत. वर्षातून जास्तीत जास्त तीन वेळा चंद्रग्रहणे होत असतात, या वर्षातील हे दुसरे चंद्रग्रहण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here