वॉशिंग्टन l अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे अंतिम US Election 2020 निकालाचं चित्र काही प्रमाणात स्पष्ट होऊ लागलं आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन Joe Biden हे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. बायडेन यांनी आपल्या पक्षाचे बराक ओबाना यांचा 12 वर्षांपुर्वीचा विक्रम मोडला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत बायडेन 7 कोटी 10 लाख पॉपुलर वोट मिळाले होते. 2008 मध्ये ओबामांना 6 कोटी 94 लाख 98 हजार 516 मते मिळाली होती.
बायडन यांनी विस्कॉन्सिन आणि मिशिगनसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचे US Election 2020 प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणूक कोण जिंकेल? जो बायडेन की डोनाल्ड ट्रम्प? याचे उत्तर आज संध्याकाळपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. सध्या बायडेन यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.
न्यूयॉर्क टाइम्सनुसार, ते 253 इलेक्टोरल वोट जिंकले आहेत. ट्रम्प यांच्या खात्यात 214 वोट आहेत. बायडेन यांनी आपल्या पक्षाचे बराक ओबाना यांचा 12 वर्षांपुर्वीचा विक्रम मोडला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत बायडेन 7 कोटी 10 लाख पॉपुलर वोट मिळाले होते. 2008 मध्ये ओबामांना 6 कोटी 94 लाख 98 हजार 516 मते मिळाली होती.
The Guardian नुसार, ट्रम्प यांना 270 चा जादुई आकडा पार करण्यासाठी 53 इलेक्टोरल मते हवी आहेत. 4 राज्यांमध्ये मतमोजणी अजुनही सुरू आहे. जर यामध्ये तीन (याची शक्यताही आहे) ट्रम्प यांना मिळाले तर ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनू शकतात. पेन्सिलवेनिया यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. तर बायडेन एकटे पेन्सिलवेनिया जिंकून बहुमतापर्यंत पोहोचू शकतात.
जर पेन्सिलवेनियामध्ये विजय मिळाला नाही तर बायडेन आपला गड नेवादा, जॉर्जिया आणइ नॉर्थ कॅरोलिनाच्या माध्यमातून व्हाइट हाउसपर्यंत पोहोचू शकतात. मात्र यामध्ये नेवादा वगळता प्रत्येक ठिकाणी ट्रम्प यांचा दबदबा आहे.
ट्रम्प पराभूत झाले का?
बायडेन यांना जास्त मते मिळाली असली तरीही न्यूयॉर्क टाइम्सचे पॉलिटिकल एक्सपर्ट एडम नार्गोनी ट्रम्प यांना बरखास्त न करण्याचा सल्ला देतता. त्यांनी म्हटले की, ट्रम्प यांचा विजय अशक्य नाही. एरिजोना, जॉर्जिया आणइ पेन्सिलवेनियाचे संपूर्ण निकाल लागू द्या. ते पुन्हा एकदा सर्वांना हैराण करु शकतात. ट्रम्प सातत्याने मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा आरोप करत आहेत. काउंटिंगदरम्यान त्यांनी ट्विट करत पेनसिल्वेनियामध्ये पाच लाख मते गायब झाल्याचा दावा केला.
मिशिगन, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमध्ये बायडन विजयी
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार माजी उपराष्ट्राध्यक्ष बायडन यांनी कोलोरॅडो, कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मेसाचुसेट्स, न्यू मेक्सिको, वरमोन्ट आणि वर्जिनियामध्ये विजय मिळवला आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे बायडन यांनी मिशिगन, विस्कॉन्सिन, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमध्येदेखील विजय मिळवला आहे. न्यूयॉर्कमध्ये बायडन यांना 22 लाख मतं तर ट्रम्प यांना 12 लाख मतं मिळाली आहेत.
बायडेन हे निवडणूक जिंकतील
अमेरिकेच्या उपाध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिसचे काका आणि इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अॅण्ड अॅनालिसिसचे माजी संचालक जी. बालाचंद्रन म्हणाले, ‘मला आशा आहे की बायडेन या निवडणुकीत विजयी होतील. फ्लोरिडा राज्य महत्वाचे आहे. या राज्यात ट्रम्प हरले तर त्यांना अध्यक्षपदावरून जावे लागेल. ट्रम्प जिंकले तरी बायडेन यांना काही हरकत नाही. कारण ते इतर राज्यातही जिंकू शकतात.
बायडेन यांचा विजय होईल तज्ज्ञांचा अंदाज
सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, बायडेन यांनी ८९ आणि ट्रम्प यांनी ७२ ‘इलेक्टोरल कॉलेज व्होट’ जिंकले. तज्ज्ञांच्या मते, बायडेन यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. मात्र असं असलं तरीही ट्रम्प यांनी देखील जोरदार टक्कर दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, निकालात उत्तर कॅरोलिना, ओहायो आणि पेनसिल्व्हेनियाची भूमिका महत्त्वपूर्ण असू शकते. ट्रम्प यांना तिन्ही राज्यांत विजय मिळवावा लागेल, तर बायडेन यांना यापैकी कोणत्याही राज्यात विजय मिळवून राष्ट्रपती होता येणार आहे.