दोन आमदारांसह विधिमंडळातील ४० अधिकारी, कर्मचा-यांना कोरोना

आजपासून पावसाळी अधिवेशन, अधिवेशनावर कोरोनाचे सावट

assembly-monsoon-session-update-maharashtra-assembly-monsoon-session-2021-assembly-monsoon-session-on-5-and-6-july-news-update
assembly-monsoon-session-update-maharashtra-assembly-monsoon-session-2021-assembly-monsoon-session-on-5-and-6-july-news-update

मुंबई : राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन आज (7 सप्टेंबर) सोमवारपासून सुरू होत आहे. दरम्यान, अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून २२०० जणांची विधिमंडळ परिसरात कोरोना चाचणी करण्यात आली. चाचण्यांमध्ये दोन आमदारांसह ४० पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने विधान भवनाच्या बाहेर करण्यात आल्या चाचण्या

दोन दिवसीय अधिवेशनात हजर राहणारे मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी, पत्रकार, सुरक्षा कर्मचारी साऱ्यांनाच करोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले. यानुसार शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस आरोग्य विभागाच्या वतीने विधान भवनाच्या बाहेर चाचण्या करण्यात आल्या. शनिवारी करण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, दोन आमदारांसह ४० अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली.

प्रवेशद्वारावरच शरीराचे तापमान मोजण्यात येणार

अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान प्रवेशद्वारावरच मोजण्यात येणार आहे. विधानभवनात जागोजागी र्निजतुकीकरण यंत्रे बसवण्यात आली आहेत. अंतर नियमांचे पालन केले जावे, यासाठी सर्वत्र सुरक्षारक्षक तैनात राहणार आहेत. काही सदस्यांना गॅलरीत बसवण्यात येणार आहे. त्याचे नियोजन संबंधित पक्षांच्या प्रतोदांकडे सोपवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आजपासून सुरु होणा-या पावसाळी अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here