Job Recruitment l टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोमध्ये जम्बोभरती

engineers-it-companies-like-tcs-infosys-and-wipro-are-hiring- again
engineers-it-companies-like-tcs-infosys-and-wipro-are-hiring- again

नवी दिल्ली l आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीसीएस TCS, इन्फोसिस INFOSYS आणि विप्रो WIPRO या कंपन्यांमध्ये कर्मचा-यांची जम्बोभरती निघाली आहे. कोरोनाकाळात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात जम्बोभरती करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षात यांत्रिकीकरणामुळे ही स्थिती मंदावली होती. जुलै ते सप्टेंबर दरम्यान या तीनही कंपन्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत आहेत. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी कंपनीच्या दुस-या तिमाहीतील कमाईनंतर सांगितले की, “आम्ही ८,००० फ्रेशर्सची भरती केली.

वाचा l ‘’राज्यपालांचे ‘आ बैल मुझे मार’ सारखे वर्तन, इथे बैल नसून ‘वाघ’आहे’’; शिवसेनेचा टोला

आमच्या या गुंतवणुकीमुळे या तिमाहीत प्रशिक्षणात वाढ झाली. कंपनीच्या अजूनही उद्योगामध्ये भरभराट येईल अशी आम्हाला आशा आहे. देशात सध्या आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण सर्वात कमी ८.९ टक्के इतके आहे.

इन्फोसिसमध्ये कर्मचारी भरती

इन्फोसिसचे सीओओ यू. बी. प्रवीण राव म्हणाले, “कंपनीच्या वाढीच्या अनुषंगाने कर्मचारी भरती होईल. या तिमाहीत आम्ही ५,५०० कर्मचाऱ्यांची भरती केली. यांपैकी देश-विदेशातील ३,००० फ्रेशर्स होते आणि २,५०० जण अनुभवी होते. एका तिमाहीत आमची कर्मचाऱ्यांची मागणी खूपच कमी झाली होती आता त्यात सुधारणा झाली आहे.”

मोठी कर्मचारी भरती करण्याची आमची योजना

विप्रोचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख सौरभ गोविल एका मुलाखतीत सांगितलं की,” विप्रो कर्मचारी भरतीबाबत मार्गदर्शन करीत नसली तरी आमच्याकडे कर्मचारी भरती करण्याची सक्षम योजना आहे. बाजाराला आता वेग आला आहे आणि यासाठी आम्ही तयार राहिलं पाहिजे. दुसऱ्या सहामाहीत मोठी कर्मचारी भरती करण्याची आमची योजना आहे. विविध बँडवर आणि प्रादेशिक स्तरावर ही भरती केली जाईल.”

वाचा l पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले?; रोहित पवारांचा ‘जलयुक्त शिवार’वरून फडणवीसांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here