मुंबई l मुक्तार अब्बास नक्वी Muktar Abbas Naqvi आणि शाहनवाज हुसैन Shahnawaz Husain यांनी केलं तर लव्ह आणि इतरांनी केलं तर लव्ह जिहाद love-jihad असं म्हणत काँग्रेस प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते सचिन Sachin Sawant सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे.
लव्ह जिहादच्या नावाने गळे काढणाऱ्यांनो थोडी तरी लाज बाळगा असाही टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा लागू करा अशी मागणी महाराष्ट्र भाजपचे नेते प्रसाद लाड,किरीट सोमय्या यांनी केली होती.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशातही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे लव्ह जिहाद विरोधात कायदा आणत आहेत. यामुळे महाराष्ट्रातही असा कायदा आणला जावा अशी मागणी भाजपाने केली आहे. त्यावरुन आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
मुख्तार अब्बास नक्वी और शाहनवाज हुसेन करे तो लव बाकी लोगों के लिए लव जिहाद!
भाजपा वालों कुछ तो शर्म करो।— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 21, 2020
आजच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रातही आणला जावा अशी मागणी केली आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहादचा हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. यावरुन आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका करत थोडी तरी लाज बाळगा असंही म्हटलं आहे.
मुक्तार अब्बास नक्वी यांच्या पत्नी सीमा आणि शाहनवाज हुसैन यांच्या पत्नी रेणू या दोघीही हिंदू आहेत. हाच मुद्दा उचलून धरत त्या दोघांनी केलं तर ते लव्ह आणि इतरांनी केलं तर ते लव्ह जिहाद असं ट्विट करत सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे.
“लव्ह जिहाद” हा केवळ भाजपाचा अजेंडा आहे
महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांसंदर्भात भाष्य केले. लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या, “लव्ह जिहाद हा केवळ भाजपाचा अजेंडा आहे.
हेही वाचा l टायर फुटल्याने कार विहिरीत पडली; औरंगाबादच्या डॉक्टरचा गुदमरून मृत्यू
भाजपा या मुद्द्यावरून केवळ शब्दांचा खेळ करताना दिसत आहे. लव्ह जिहाद कुठे झालाय? हे आम्ही भाजपाला नक्कीच दाखवून देऊ. पण लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. भाजपा नेते मात्र यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे”, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.
हेही वाचा l Dhananjay Mundhe l“भाजपाला ‘जय’ आणि ‘नाथ’ चालत नाहीत”; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल
[…] […]
[…] […]
[…] […]