मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खानला (Aryan khan) क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केली आहे. तो सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. मात्र अटकेनंतर आर्यन खानच्या वकीलांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज बुधवारी फेटाळून लावला आहे. त्यामुळे आर्यन खानच्या वकीलांनी जामीनासाठी हायकोर्टात अपील केली आहे. यातच आज गुरुवारी आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड कारागृहात पोहाचला आहे.
२० ऑक्टोबरच्या सुनावणीदरम्यानही अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला.
हेही वाचा – Aryan Khan Drug Case: शाहरुख खान आर्यन से मिलने पहुंचे आर्थर रोड जेल
कोरोनाकाळात बंद असलेल्या जेलमधील भेटी पुन्हा सुरू झाल्य़ाने आर्यनला भेटण्यासाठी देखील त्याच्या कुटुंबियांना मुभा देण्यात आली. त्यामुळे आर्थर रोड कारागृहात आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख खान पोहचला आहे. तब्बल तीन आठवड्यानंतर जेल प्रशासनाने शाहरुख खानला आर्यनला भेटण्याची परवानगी दिली आहे. एकावेळी केवळ दोन नातेवाईंनाच भेटण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र शाहरुख खान एकटा मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी पोहचला आहे. यावेळी गौरी खान त्याच्या सोबत दिसली नाही.
आर्यन खानची न्यायालयीन कोठडी आज संपणार आहे. मात्र मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनडीपीएस कोर्टाने जामीन नाकारल्याने आर्यन खान सध्या आर्थर रोड कारागृहातच आहे. त्याला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल. मात्र आर्यनची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी पुन्हा एकदा वाढेल अशी शक्यता आहे.