जगातील सर्वात प्रभावी १०० लोकांच्या यादीत पंतप्रधान मोदींना स्थान नाही, भारतातून शाहरूख खान,राजामौलींचा समावेश

‘टाइम’ मॅगेझीनने जगातील सर्वात प्रभावी १०० लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतातून केवळ दोन व्यक्तींचा समावेश झाला आहे.

worlds-100-most-influential-people-list-by-time-know-who-are-they-news-update-today
worlds-100-most-influential-people-list-by-time-know-who-are-they-news-update-today

TIME’s World 100 Most Influential People 2023 : ‘टाइम’ मॅगेझीनने जगातील सर्वात प्रभावी १०० लोकांची यादी जाहीर केली आहे. यात जगभरातील राष्ट्रप्रमुख, उद्योगपती, कलाकार, गायक, खेळाडू, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. या यादीत भारतातून केवळ दोन व्यक्तींचा समावेश झाला आहे. यात अभिनेता शाहरूख खान (ShahRukh Khan) आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे याआधी या यादीत समावेश असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यावर्षी यादीत समावेश नाही.

शाहरूख आणि राजामौली यांच्याशिवाय या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, टेस्लाचा प्रमुख एलॉन मस्क, किंग्ज चार्ल्स, लेखक सलमान रश्दी, न्यायमूर्ती पद्मलक्ष्मी इत्यादींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यंदा प्रभावी व्यक्तींच्या यादीत पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विक्रमी १६ लोकांचा समावेश आहे.

 शाहरूख खानला सर्वाधिक मतं

‘टाइम’ हे एक अमेरिकेतील प्रतिष्ठित मासिक आहे. दरवर्षी या मासिकाकडून जगातील सर्वात प्रभावशाली अशा १०० लोकांची यादी जाहीर केली जाते, यात अनेक मोठ्या लोकांचा समावेश असतो. या मॅगझीनचा वाचकवर्ग यासाठी मतदान करतो. २०२३ च्या यादीसाठी झालेल्या मतदानात सर्वात जास्त मतं ही शाहरुख खानला मिळाली आहे. या मतांची संख्या तब्बल १.२ मिलियन म्हणजेच १२ लाख इतकी आहे. हे एकूण मतदानाच्या ४ टक्के मतं आहेत. एका अमेरिकी मासिकात एवढ् मोठ्या प्रमाणात शाहरुख खानला मिळालेल्या मतांवरून पुन्हा एकदा त्याची जागतिक पातळीवरील लोकप्रियता आणि प्रभाव अधोरेखित झाला आहे.

 २०२१ मध्ये मोदींचा प्रभावशाली १०० व्यक्तींमध्ये समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘टाइम’ मॅगझीनच्या ‘२०२१ मधील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तीं’च्या यादीमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र, यंदा त्यांचा या यादीत समावेश झालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here