IPL 2020 | बीसीसीआयने केलं ‘प्ले-ऑफचे’ वेळापत्रक जाहीर, ‘या’ ठिकाणी होणार अंतिम सामना

आयपीएलचा अंतिम सामना हा दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये

bcci-has-announced-the-schedule-and-venue-for-the-ipl-2020-play-offs-and-venues-for-the-womens-t20-challenge
bcci-has-announced-the-schedule-and-venue-for-the-ipl-2020-play-offs-and-venues-for-the-womens-t20-challenge

मुंबई l बीसीसीआयने आयपीएलच्या 13 व्या मोसमाच्या प्ले ऑफचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. Bcci Has Announced The Schedule And Venue For The Ipl 2020 यासोबत बीसीसीआयने महिला WOMEN’S T20 चॅलेंज 2020 या स्पर्धेच्या ठिकाणांची माहिती जाहीर केली आहे.

बीसीसीआयच्या वेळापत्रकानुसार आयपीएलचा अंतिम सामना हा दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे. अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

असे आहे ‘प्ले-ऑफचे’ वेळापत्रक

क्वालिफायर 1 – 5 नोव्हेंबर (दुबई)

एलिमिनेटर- 6 नोव्हेंबर (अबुधाबी)

क्वालिफायर 2- 8 नोव्हेंबर (अबुधाबी)

फायनल-10 नोव्हेंबर (दुबई)

IPL 2020 PLAY OFF TIME TABLE AND VENUE

आकडेवारीनुसार पॉइंट्सटेबलमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 14 गुणांसह अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या 3 संघांना प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी केवळ 1 विजयाची आवश्यकता आहे. त्यामुळे प्ले ऑफसाठी 3 संघ जवळपास निश्चित आहेत.

वाचा l walnuts Benefits अक्रोड खाण्याचे 10 फायदे जाणून घेऊयात

मात्र 4 थ्या क्रमांकासाठी कोलकाता, पंजाब आणि राजस्थान यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. पंजाबने या स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी 3 संघांमध्ये तगडे आव्हान असणार आहे.

तसेच बीसीसीआयने प्ले ऑफसह आणि महिलांच्या टी 20 चॅलेंज 2020 च्या स्पर्धेचे ठिकाणही जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसाआयने या स्पर्धेचं वेळापत्रकही जाहीर केलं होतं. मात्र ठिकाण जाहीर केलं नव्हतं. या स्पर्धेतील सर्व सामने शारजा स्टेडियमवर खेळण्यात येणार आहेत.

असं आहे टी 20 स्पर्धेचं वेळपत्रक

WOMENS T 20 CHALLENGE VENUE

पहिला सामना : सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी, शारजा, 4 नोव्हेंबर, संध्याकाळी 7:30 वाजता

दुसरा सामना : वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स, 5 नोव्हेंबर, शारजा, दुपारी 3:30 वाजता

तिसरा सामना : ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवाज – 7 नोव्हेंबर, शारजा, संध्याकाळी 7:30 वाजता

फायनल: 9 नोव्हेंबर, शारजा, संध्याकाळी 7:30 वाजता

हे आहेत संघ

सुपरनोवाज : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमीमह रॉड्रिग्स (उपकर्णधार), चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शशिकला श्रीवर्धने, पूनम यादव, शकेरा सेलमॅन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, आयुषी सोनी, आयाबोंगा खाका, मुस्कान मलिक

ट्रेलब्लेझर्स : स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पुनम राऊत, रिचा घोष, डी. हेमलथा, नुझत परविन (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हर्लीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातून, सोफी इक्लेस्टोन, नाथकं चाणथम, डीन्ड्रा डॉटिन, काश्वी गौतम

वेलोसिटी : मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ति , शैफाली वर्मा, सुषमा वर्मा (विकेटकीपर), एकता बिष्ट, मानसी जोशी, शिखा पांडे, देव्या वैद्य, सुष्री दिब्यादर्शिनी, मनाली दक्षिणिणी, लीघ कास्पेरेक, डॅनियल व्यान लुस, जहाँआरा आलम आणि एम अनघा

वाचा l  Oily Skin आयुर्वेदिक घरगुती उपायांमुळे तेलकट त्वचेची कटकट होईल दूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here