मुंबई : भारतीय जनता पार्टीकडून (BJP) सरकारी यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण केला जात आहे. भाजपच्या आय.टी. सेलकडून रोज हिंदूत्त्वाचा मुद्दा घेऊन व्देश पसरवला जातो. भाजपचे कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार, खासदार अनेक वेळा धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करतात. त्यामुळे लोकांमध्ये अनेक गैर समज तयार होतात. भाजप हिंदूत्त्वचा मुद्दा पुढे करुन हुकूमशाही पद्धतीने कारभार करू पाहत आहे. हे लोकशाही मुल्यांना मारक आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास साधणार नाही. हा ढोंगीपणा उघड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lavande) यांनी भाजपला 30 प्रश्न विचारले आहेत.
वाचा काय आहेत 30 प्रश्न…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी केली त्याचे देशाला कोणते फायदे झाले आहेत. विदेशातील किती काळा पैसा भारतामध्ये आला.
जम्मू काश्मीर मधील दहशतवादी घटना कमी झाल्या का ?
देशामधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे का ?
पूर्वी जीएटीला विरोध करणाऱ्या भाजपने (BJP) सत्तेमध्ये आल्यावर यु टर्न का घेतला? या बाबत माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ मनमोहन सिंह यांचे ते मार्गदर्शन घेणार आहेत का?,
घोषणा केल्याप्रमाणे 100 स्मार्टसीटी तयार झाल्या का ?
इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. त्यांचे दर गगनाला भीडले आहेत, त्याचा होणारा नफा जाहीर का करत नाही?
मराठा, जाट, गुज्जर, रजपूत, पटेल या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कधी सोडवणार?
सरकारी योजनांमुळे किती शेतकऱ्यांचे उत्पन्न दोन पटींनी वाढले?
देशावरील कर्ज 8 वर्षांत दोन पटीने का वाढले ?
केंद्रातील भ्रष्टाचारात दुपटीने वाढ का झाली?
तपास यंत्रणा भाजपच्या नेत्यांच्या मागे का लागत नाहीत?
मानव विकास निर्देशांक खाली का घसरतोय?,
शेतकरी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणारे 600 शेतकरी शहीद झाले, त्यांच्या कुटुंबियांना सरकारने कोणती मदत केली.
वाढत्या बेरोजारीचे काय?,
डॉलरच्या किमतीमध्ये रूपयाचे अवमूल्यन होत आहे त्याचे काय?
केंद्र सरकारच्या मालकीच्या अनेक कंपन्या तोटयात जाऊन त्या एकामागोमाग एक विकल्या जात आहेत. त्यावर सरकारचे धोरण काय आहे. भाजप धर्माचा राजकारणासाठी वापर करत आहे.
भारत हा केवळ हिंदूचा देश बनवण्याची भाषा वारंवार केली जाते, त्याची राज्यघटना काय असेल?, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात मध्ये सांगतील का?,
आठ वर्षांमध्ये हिंदूच्या जीवनमानामध्ये कोणता बदल झाला?
200, हजारच्या नोटा चलानातून कुठे गायब होत चालल्या आहेत?
आठ वर्षामध्ये सरकारने किती शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, उदयोधंदे निर्माण केले?
विवेकानंद यांना अभिप्रेत असणारा हिंदू धर्म भाजपला मान्य का नाही?
केंद्र सरकारमध्ये अर्थतज्ञ कोण आहे, त्याचे नाव देशतील जनतेला समजेल का?
भाजपच्या अब्जावधी पक्ष निधीची चौकशी ईडीमार्फत होईल का?
अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती बंद करण्यासाठी भाजपने कोणती पावले उचलली?
इंधनाचे दर परदेशात कमी झाले आहेत, भारतात कधी कमी होतील?
अशा प्रकारे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे भाजपने देशातील जनतेला दिली पाहिजेत, तशी मागणी विरोधी पक्षातील नेते मंडळी वारंवार करत आहे.