मुंबई l चंद्रकांतदादा तुम्ही विद्यार्थी परिषदेत होतात, काहीतरी कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून तुम्ही भाजपात आलात. तुम्हाला सगळं काही फुकट मिळालं. कोल्हापुरात आमदार आणि खासदार सोडाच साधा पंचायत समितीचा सदस्य तरी तुम्हाला निवडून आणता येईल का? असा प्रश्न एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटील यांना विचारला आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात आता शाब्दिक वाद सुरु झाले आहेत. एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून कॅडबरी मिळते की लिमलेटची गोळी तेच बघायचं आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्याला एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे.
चंद्रकांतदादा तुमचा भाजपाशी संबंध काय? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आलात असं म्हणत एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर एकनाथ खडसे म्हणाले, भाजपाने मला काहीही फुकट दिलेलं नाही. त्यासाठी मी भाजपाला चाळीस वर्षे दिली आहेत असंही खडसे यांनी म्हटलं आहे.
वाचा l ‘’नाथाभाऊंनी माझ्याकडे कोणतीही मागणी केली नाही’’;शरद पवारांचा खुलासा
भाजपाने मला काहीही फुकट दिलेलं नाही. मी माझं ४० वर्षांचं आयुष्य भाजपाला दिलं आहे. मी जे काही मिळवलं ते मनगटाच्या जोरावर मिळवलं आहे. चंद्रकांत पाटील यांचा भाजपाशी संबंध तरी काय होता? चंद्रकांतदादा तुम्ही विद्यार्थी परिषदेत होतात, काहीतरी कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून तुम्ही भाजपात आलात.
भाजपामध्ये माझा छळ झाला, माझी बदनामी झाली त्यामुळे मी पक्ष सोडला. काही मिळवण्यासाठी मी पक्ष सोडला नाही. माझा भूखंडाशी काहीही संबंध नाही, तरीही माझी चौकशी करण्यात आली. आता माझ्याकडे काही लोकांच्या भूखंड गैरव्यवहाराची कागदपत्रं आहेत. त्याच्या चौकशीची मागणी मी करणार आहे असंही त्यांनी सांगितलं.
वाचा l shahrukh khan शाहरुख खान झळकणार ‘या’ तीन चित्रपटांमध्ये
चंद्रकांत पाटील म्हणाले होते…
एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत दुपारी २ वाजता प्रवेश घेणार होते त्या प्रवेशाला चार वाजले. राष्ट्रवादीचं खडसेंना काय द्यायचं ते ठरलेलं नाही. तुमचं समाधान होईल असं देऊ या शब्दावर नाथाभाऊ बळेबळे नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले. आता तुमचं समाधान होईल यामध्ये लिमलेटच्या गोळीनेही समाधान होतं आणि कॅडबरीनेही. त्यामुळे राष्ट्रवादी आता खडसेंना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी ते बघावं लागेल.