BJP Parliamentary Board: भाजपाच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहानांना डच्चू!

cabinet-minister-nitin-gadkari-shivraj-singh-chauhan-removed-from-bjp-parliamentary-committee-and-central-election-committee-news-update-today
cabinet-minister-nitin-gadkari-shivraj-singh-chauhan-removed-from-bjp-parliamentary-committee-and-central-election-committee-news-update-today

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)आणि ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान (Shivraj singh chauhan)यांना केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपाच्या संसदीय मंडळातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (S. Yediyurappa) आणि सरबानंद सोनोवाल (Sarbananda Sonowal) यांनी संसदीय मंडळात स्थान देण्यात आले आहे. 

 भाजपाच्या संसदीय मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, के. लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, आणि बी. एल. संतोष या नेत्यांचा समावेश आहे. भाजपाने केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्यांची यादी देखील जाहीर केली आहे.

या समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले आहे. भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष के. लक्ष्मण यांचा देखील या यादीत समावेश करण्यात आला आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here