मोठी बातमी : महाराष्ट्रात लसीकरण थांबवले, ‘हे’ आहे कारण

Nurs who had taken covid-19 vaccing gets positive
Nurs who had taken covid-19 vaccing gets positive

मुंबईः को-विन अँपच्या Cowin app तांत्रिक अडचणीमुळे महाराष्ट्रात रविवार १७ आणि सोमवार १८ जानेवारी रोजी कोरोना लसीकरण covid-19-vaccination होणार नाही. तांत्रिक समस्या दूर झाल्यानंतर लसीकरणाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

महाराष्ट्रात शनिवारी पहिल्याच दिवशी २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. संध्याकाळपर्यंत राज्यात १८ हजार ३३८ हून अधिक कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. संध्याकाळी उशिरापर्यंत लसीकरण सुरू होते.

पहिल्या दिवशी को-विन अँपवर नोंदणी करण्यासाठी वेळ लागत होता. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ऑफलाइन नोंदणी करण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र केंद्र सरकारने अॅपवर नोंदणीचे बंधन घातले आहे. तंत्रज्ञ महाराष्ट्रातील समस्या दूर करत आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात १७ आणि १८ जानेवारी या दोन दिवसांसाठी कोरोना लसीकरण स्थगित केले आहे. या कालावधीत ऑफलाइन केलेल्या सर्व नोंदी अॅपवर अपडेट केल्या जातील.

अँपवर माहिती नोंदवण्यास अडचणी येतात की नाही याची तांत्रिक तपासणी पूर्ण केली जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकार लसीकरण कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याबाबतची घोषणा करणार आहे.

लस घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती अँपवर नोंदवली जात आहे. या माहितीचे विश्लेषण करुन कोरोना संकटाचा मुकाबला करण्यात देशाला किती यश मिळाले याचा आढावा विशिष्ट कालावधीनंतर घेणे सोपे होणार आहे.

लसचा पहिला डोस घेतल्यास दुसऱ्या डोससाठी कधी यायचे याची माहिती संबंधित व्यक्तीला दिली जाईल. तसेच त्या व्यक्तीला आठवण करण्यासाठी मेसेज पाठवणे सोपे जाणार आहे. याच कारणामुळे को-विन अँपवर नोंदणी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. 

देशात सर्वाधिक कोरोनाबाधीत महाराष्ट्रात आहेत. याच कारणामुळे महाराष्ट्रात लसीकरण व्यवस्थित पार पडणे आवश्यक आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशात अनेक ठिकाणी अधून मधून माहिती नोंदवण्यासाठी वेळ लागत होता.

अनेक राज्यांतील समस्या तंत्रज्ञांनी लक्षात आल्यावर लगेच उपाय करुन दूर केल्या. मात्र महाराष्ट्रात समस्या निर्माण झाल्यावर दिवसभरात लसीकरण ऑफलाइन नोंदणी करुन करण्यात आले.

यामुळे केंद्र सरकारसाठी नेमकी आकडेवारी मिळवण्यात अडचणी आल्या. अखेर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील समस्या दूर करण्याला तातडीने प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आणि सर्व डेटा अपडेट करण्याचे आदेश दिले. 

या कालावधीत ऑफलाइन केलेल्या सर्व नोंदी अँपवर अपडेट केल्या जातील. अँपवर माहिती नोंदवण्यास अडचणी येतात की नाही याची तांत्रिक तपासणी पूर्ण केली जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकार लसीकरण कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याबाबतची घोषणा करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here