Harish salve l ज्येष्ठ वकील हरिश साळवे वयाच्या ६५ व्या वर्षी पुन्हा विवाहबंधनात अडकले

ब्रिटीश मैत्रीण कॅरोलिन ब्रॉसर्ड हिच्याशी लंडनमधील चर्चमध्ये झाला विवाह

harish-salve- Senior-advocate-marries-london-based-artist-caroline-brossard-in-church-ceremony
harish-salve- Senior-advocate-marries-london-based-artist-caroline-brossard-in-church-ceremony

माजी सॉलिसिटर जनरल आणि सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील हरिश साळवे Harish salve दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. ६५ वर्षीय हरिश साळवे यांनी आपली ब्रिटीश मैत्रीण कॅरोलिन ब्रॉसर्ड caroline brossard हिच्याशी लंडनमधील चर्चमध्ये विवाह केला. 

हरिश साळवे यांच्या प्रमाणेच कॅरोलिनचाही हा दुसरा विवाह आहे. ५६ वर्षीय कॅरोलिन ब्रिटीश कलाकार आहे आणि तिला एक मुलगीही आहे.  साळवे यांनी या वर्षाच्या सुरूवातीला ३८ वर्षांपर्यंत जोडीदार राहिलेल्या मीनाक्षी साळवे यांच्याकडून घटस्फोट घेतला. हरीश साळवे आणि मीनाक्षी यांना दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे नाव साक्षी आणि लहान मुलीचे नाव सानिया आहे.  

 हरिश साळवे यांचे लग्न लंडनमधील एका चर्चमध्ये पार पडले.लग्नाच्या या छोटेखानी समारंभात केवळ १५ लोक सामील होते. यात दोनही कुटुंबातील लोक आणि काही खास मित्रपरिवार होता. कॅरोलिन एक आर्टिस्ट आहेत. हरिश साळवे यांची कॅरोलिनशी भेट एका आर्ट इव्हेंटदरम्यान झाली होती. साळवे नॉर्थ लंडनमध्ये राहतात. एका वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. 

हरिश साळवे आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड यांची एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली होती.

हेही वाचा l “आरोग्य सेतू अ‍ॅप सुद्धा आत्मनिर्भर अ‍ॅप की देवाची करणीच”; काँग्रेसचा भाजपाला टोला

दोघांनाही थिएटर, शास्त्रीय संगीत तसंच कलेची आवड आहे.

३८ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर साळवे वेगळे झाले होते. त्यांना दोन मुली आहेत. तर कॅरोलिन ब्रॉसार्ड यांचंही हे दुसरं लग्न असून त्यांना १८ वर्षांची एक मुलगी आहे.

१ नोव्हेंबर १९९९ ते ३ नोव्हेंबर २००२ या कार्यकाळात त्यांनी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया म्हणूनही काम केलं आहे.

हरीश साळवे यांनी महाराष्ट्रातील नागपूर शहरात शिक्षण घेतलं. १९७६ मध्ये साळवे दिल्लीत गेले हे उच्च वरिष्ठ वकील आणि त्यानंतर सॉलिसिटर जनरल बनले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here