पॅलेस्टाइनवर इस्रायलचा हल्ला; हमास प्रमुख याह्या अल सिनवार यांचेही घर उद्धवस्त!

israel-palestine-clash-israel-launches-most-intense-raids-in-gaza-hamas-chief-was-also-targeted-news-update
israel-palestine-clash-israel-launches-most-intense-raids-in-gaza-hamas-chief-was-also-targeted-news-update

जेरुसलेम: इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील भीषण संघर्ष सातव्या दिवशीही सुरू आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांद्वारे हवाई हल्ले सुरूच आहे. तर, हमासदेखील सातत्याने रॉकेट हल्ला करत आहे. सोमवारपासून हमासने २३०० रॉकेट डागले असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलने हमासविरोधात आपली कारवाई तीव्र केली असून आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या अल सिनवार यांचेही घर उद्धवस्त झाले असल्याचा दावा करण्यात करण्यात आला आहे.

इस्रायल-पॅलेस्टाइनच्या संघर्षात आतापर्यंत ४१ मुलांसह १४९ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. तर, जवळपास एक हजार नागरिक ठार झाले आहेत. हमासच्या रॉकेट हल्ल्यात इस्रायलचे कमीत कमी १० जण ठार झाले आहेत.

इस्रायलकडून नागरी भागांवर हल्ले सुरू करण्यात आले आहेत. तर, हमासच्या रॉकेट हल्ल्यात इस्रायलमध्ये कमीत कमी १० जण ठार झाले आहेत. निवासी इमारतींमध्ये लपून हमासकडून रॉकेट हल्ले सुरू असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. त्यामुळे या इमारती उद्धवस्त केल्या जात आहेत.

हेही वाचा: काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन

निवासी इमारतींवर हल्ला करण्यापूर्वी इमारतीमधील नागरिकांना बाहेर पडण्यास सांगितले होते. या इमारतींमध्ये अल जझीरा आणि अन्य काही माध्यमांची कार्यालये होती. गाझामध्ये हमास प्रमुख याह्या अल सिनवारच्या घरावर इस्रायलने हल्ला केला.

इस्रायलमध्ये अनेक शहरांमध्ये लष्करासोबत संघर्ष

इस्रायल आणि हमास दरम्यान सुरू असलेल्या संघर्षा दरम्यान वेस्ट बँक भागात पॅलेस्टाइन नागरिकांनी मोठे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान इस्रायली सैन्याच्या कारवाईत कमीत कमी ११ जण ठार झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here