झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी उडवला रेल्वे ट्रॅक

दिल्ली-हावडा मार्गावरील वाहतूक ठप्प; अनेक ट्रेनचे बदलले मार्ग

jharkhand-naxalites-blasted-railway-track-in-giridih-changed-routes-of-many-trains-news-update
jharkhand-naxalites-blasted-railway-track-in-giridih-changed-routes-of-many-trains-news-update

धनबाद:झारखंडमधील गिरिडीह जवळ गुरुवारच्या मध्य रात्री नक्षलवाद्यांनी बॉम्ब हल्ला करून रेल्वे ट्रॅक उडवला. त्यानंतर हावडा-गया-दिल्ली रेल्वे मार्गावरील ट्रेनची वाहतूक बंद करण्यात आली. तर काही ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले.

पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ राजेश कुमार यांच्या माहितीनुसार, पेट्रोलमन गौरव राज आणि रोहित कुमार सिंह यांनी स्टेशन मास्टरला सांगितले की, रात्री १२.३४ वाजता धनबाद भागातील करमाबाद-चिचाकी स्टेशन दरम्यान स्फोट झाला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हावडा-दिल्ली रेल्वे मार्गाच्या गोमो-गया (जीसी) रेल्वे विभागातील येणाऱ्या-जाणाऱ्या लाईनवरील ऑपरेशन्स थांबवण्यात आले आहे.

रद्द केलेली ट्रेन
१३३०५ धनबाद-डेहरी ऑन सोन एक्सप्रेस रद्द


या ट्रेनटचे मार्ग बदलले
>>१२३०७ हावडा-जोधपूर एक्स्प्रेस प्रवासाची सुरुवात २६.०१.२२ प्रधानखंटा-गया-DDU ऐवजी झाझा-पाटणा-DDU मार्गे धावेल.
>>१२३२१ हावडा-छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्स्प्रेसच्या प्रवासाची सुरुवात २६.०१.२०२२ प्रधानखंटा-गया-DDU ऐवजी झाझा-पाटणा-DDU मार्गे धावेल.
>>१२३१२ कालका- हावडा एक्स्प्रेस २५.०१.२०२२ रोजी गया-पाटणा-झाझा ऐवजी DDU-गया प्रधानखंटा मार्गे धावेल.
>>१२३२२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा एक्स्प्रेस २५.०१.२२ रोजी गया-पाटणा-झाझा ऐवजी DDU-गया प्रधानखंटा मार्गे धावेल.
>>२२८२४ नवी दिल्ली-भुवनेश्वर राज एक्स्प्रेस, १२३१४ नवी दिल्ली-सियालदह राजधानी एक्स्प्रेस आणि १२३०२ नवी दिल्ली-हावडा राजधानी एक्स्प्रेस २६.०१.२०२२ रोजी DDU-गया-प्रधानखंटा ऐवजी DDU-पाटणा-झाझा मार्गे धावेल.
>>१२८१६ आनंद विहार-पुरी एक्स्प्रेस २६.०१.२०२२ रोजी कोडरमा-नेसुचबो गोमो ऐवजी हजारीबाग टाउन-बरकाकाना मार्गे धावेल.
>>१२८२६ आनंद विहार-रांची झारखंड संपर्क क्रांती एक्स्प्रेस २६.०१.२०२२ रोजी कोडरमा-राजाबेरा ऐवजी कोरडमा-हजारीबाग टाउन-बरकाकाना मार्गे धावेल.

या गाड्या थांबवल्या
•१३३२९ धनबाद-पटना एक्स्प्रेस चौधरीबांधमध्ये ००.३५ वाजल्यापासून थांबविण्यात आली.
•१८६२४ हटिया-इस्लामपूर एक्स्प्रेस पारसनाथ येथए ००.३७ वाजता थांबवली.
•१८६०९ रांची-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस पारसनाथ येथे ००.५५ वाजता थांबवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here