US Open : नोवाक जोकोविचची ‘यूएस ओपन’मधून ‘या’ कारणामुळे हकालपट्टी

लाईन जजच्या घशावर चेंडू मारल्याने कारवाई

Novak Djokovic-World No 1 Tennis Star- has been DEFAULTED from the US Open
Novak Djokovic-World No 1 Tennis Star- has been DEFAULTED from the US Open

न्यूयॉर्क : यूएस ओपनमधून टेनिसस्टार नोवाक जोकोविचची हकालपट्टी करण्यात आली. नोवाक ने लाईन जजच्या घशावर चेंडू मारल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे जोकोविचच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. (World No 1 Tennis Star Novak Djokovic has been DEFAULTED from the US Open)

पाहा व्हिडीओ

आपले 18 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्यास उत्सुक असणा-या नोवाकने केलेली चूक त्याला महागात पडली. पहिल्या सेटमध्ये चौथ्या फेरीत प्रतिस्पर्धी पाब्लो कॅरेनो बुस्टा याने जोकोविचला 6-5 ने पिछाडीवर टाकले, तेव्हा रागाच्या भरात (अनवधानाने) त्याने मारलेला चेंडू लाईन जजच्या घशावर लागला. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

ह्या नियमाचे उल्लंघन

ग्रँडस्लॅमच्या अधिकृत नियम पुस्तिकेतील तिसऱ्या अनुच्छेदात असलेल्या कलम ‘एन’चे जोकोविचने उल्लंघन केले, ते म्हणजे प्लेअर ऑन-साइट नियमभंग. त्यानुसार “बॉल अ‍ॅब्युज” म्हणजे “खेळाडूने सामन्यादरम्यान पॉइंट मिळवण्याचा उद्देश वगळता हिंसकपणे, धोकादायकपणे किंवा रागाने स्पर्धेच्या आवारात टेनिस बॉल मारणे, फेकणे अथवा किक मारणे नियमबाह्य आहे”

चेअर अंपायर (पंच) ऑरेली टूर्ट यांनी यूएस ओपन स्पर्धेचे रेफरी सोरेन फ्रेमेल आणि मुख्य ग्रँड स्लॅम सुपरवायझर आंद्रेस एगली यांना बोलावले. त्यांनी एकमेकांशी सल्लामसलत केली आणि संबंधित सर्व तथ्य एकत्रित पडताळून हा निर्णय घेतला. सुदैवाने लाईन जजची प्रकृती ठीक आहे.

परिणामी, यूएस ओपनमध्ये मिळवलेले रँकिंग पॉईंट जोकोविचला गमवावे लागतील. दंडाच्या रकमेसह पारितोषिकात मिळालेली रक्कमही त्याला सोडावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here