“शाळा, महाविद्यालय बंद ठेवायची, मग परीक्षा कशा घ्यायच्या?” उदय सामंतांचा हल्लाबोल

Minister of Higher Education And Technical Uday Samant question central government and UGC
Minister of Higher Education And Technical Uday Samant question central government and UGC

मुंबई : देशात केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉकचा चौथा टप्पा जाहीर केला. त्यानुसार ३० सप्टेंबपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंदच राहणार आहेत. मग परीक्षा कशा घ्यायच्या असा सवाल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकार आणि युजीसीला ट्विट करत विचारला आहे. 

राज्य परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. ज्या राज्यांना वाटत आहे की त्यांना परीक्षा घेणे शक्य नाही, त्या राज्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे जावे. परंतु राज्य अंतिम सत्र परीक्षा घेतल्याशिवाय पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करू शकत नाहीत, असा निकाल देत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होतं.

मात्र, शनिवारी अनलॉकचा चौथा टप्पा जाहीर केला. यामध्ये ३० सप्टेंबरपर्यंत शाळा बंद ठेवाव्यात असा आदेश काढण्यात आला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी यावरुन केंद्राला सवाल केला आहे. उदय सामंत यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे. “केंद्र सरकार म्हणते ३० तारखेपर्यंत शाळा व महाविद्यालय लॉकडाउन मुळे बंद राहणार ..यूजीसी म्हणते 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या ..राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचं काय ..30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील तर परीक्षा घ्यायच्या कशा.” असा प्रश्न उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here