विरोधकांना महाराष्ट्राची चिंता असेल तर त्यांनी अधिवेशन चालू द्यावं; राऊतांचा भाजपला सल्ला

sanjay-raut-allegation-on-bjp-mla-rahul-kul-bhima-sugar-factory-wrote-letter-to-devendra-fadnavis-criticized-ex-bjp-mp-kirit-somaiya-news-update-today
sanjay-raut-allegation-on-bjp-mla-rahul-kul-bhima-sugar-factory-wrote-letter-to-devendra-fadnavis-criticized-ex-bjp-mp-kirit-somaiya-news-update-today

मुंबई l मुंबई येथे उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी भाष्य केलं. विरोधकांना महाराष्ट्राची चिंता असेल तर त्यांनी अधिवेशन चालू द्यावं. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन आहे. त्यात गोंधळ घालू नये. चर्चा करावी. गोंधळ म्हणजे रणनीती नसते. असा टोला राऊतांनी विरोधकांना लगावला. Maharashtra legislature Assemblys and Council Monaoon Session 2021 

गोंधळ करून अधिवेशन बंद पाडणं योग्य नाही. गोंधळात अधिवेशन वाहून जाऊ नये, असं सांगतानाच राज्यापुढे अनेक प्रश्न आहे. एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यावर चर्चा होऊ शकते. कोरोनावर चर्चा होऊ शकते, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊ शकते, असंही राऊत म्हणाले.

भाजप नेते आशिष शेलार यांना भेटल्याच्या वृत्ताचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी इन्कार केला आहे. मी काल कुणालाही भेटलो नाही. या सर्व अफवा आहेत. अशा अफवांनी राजकारण हलत नाही. अफवा पसरवण्याचे कारखाने सुरू आहेत. ते दिवाळखोरीत निघतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार काल मुंबईत भेटल्याचं चर्चा होती. त्या वृत्ताचं आशिष शेलार यांनी इन्कार केला. आज राऊत यांनीही त्याचा इन्कार केला. अफवा पसरवल्या जातात. ज्यांना माझ्यापासून वेदना होतात, यातना होतात असे लोक अफवा पसरवत असतात.

महाराष्ट्रात दोन वेगळ्या पक्षाचे नेते भेटले तर आश्चर्य वाटण्याचं कारण काय?, असा सवाल करतानाच मी काल दिवसभर कामात होतो. कुणालाही भेटलो नाही. तरीही अफवा पसरवण्यात आल्या. अशा अफवा पसरवल्याने राजकारण हलत नाही, अस्थिरही होत नाही. महाराष्ट्र सरकारला अडचणीही होत नाही. पण अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील, असं राऊत म्हणाले.

हेही वाचा :

Rafale Deal Scandal l राफेल घोटाळ्याची चौकशी टाळून मोदी सरकार कोणाला वाचवत आहे ?

Petrol-Diesel Price Today: आज फिर महंगा हुआ पेट्रोल-डीजल, रिकॉर्ड स्तर पर पहुंची कीमतें !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here