नेहा कक्करने कुटुंबीयांसोबत साजरी केली होळी,पाहा स्विमिंग पूलमधील व्हिडीओ

neha-kakkar-share-pre-holi-fun-in-pool-with-rohanpreet-singh- video viral
neha-kakkar-share-pre-holi-fun-in-pool-with-rohanpreet-singh- video viral

गायिका नेहा कक्कर Neha-kakkar पती रोहनप्रीत सिंहसोबत Rohanpreet-singh लग्नानंतरची पहिली होळी साजरी करत आहे. नेहा होळी साजरी करण्यासाठी संपूर्ण कुटुंबीयांसोबत ऋषिकेश येथे पोहोचली आहे. नुकताच नेहाने सोशल मीडियावर होळी साजरी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर होळी साजरी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कुटुंबीयांसोबत स्विमिंग पूलमध्ये मजामस्ती करताना दिसत आहे. तसेच व्हिडीओमध्ये नेहासोबत तिचा पती रोहनप्रीत सिंह, भाऊ टोनी कक्कर आणि इतर कुटुंबीय दिसत आहेत. ‘तेरा सूट’ हे गाणे देखील सुरु असल्याचे दिसत आहे.

बुधवारी नेहा रोहनप्रीतसोबत होळी साजरी करण्यासाठी ऋषिकेश गेली. तिकडे पोहोचल्यावर गुरुवारी रात्री नेहा पतीसोबत सासरी गेली. आता २८ मार्च रोजी नेहा पुन्हा ऋषिकेशला येणार आहे. २९ मार्चला ती गंगानगर येथील तिच्या घरी राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here