Petrol Price Today 17 July l पेट्रोलच्या दरात आज पुन्हा वाढ; जाणून घ्या आपल्या शहरातील दर

petrol-diesel-prices-today-17-july-maharashtra-delhi-mumbai-kolkata-chennai-check-rates-in-your-city-news-update
petrol-diesel-prices-today-17-july-maharashtra-delhi-mumbai-kolkata-chennai-check-rates-in-your-city-news-update

नवी दिल्ली l तेल कंपन्यांनी शनिवारी डिझेलच्या दरात कुठलीही वाढ केली नसली तरी पेट्रोलच्या दरात मात्र पुन्हा वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल 30 पैशांनी वाढलं असून डिझेल दर स्थिर आहेत. देशभरात तेलाच्या किमतींनी सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. पेट्रोलनं केव्हाच शंभरी ओलांडली आहे, तर डिझेलचे दर शंभरी गाठण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी गुरुवारी पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलच्या दरात 15 पैसे प्रति लिटरनं वाढ करण्यात आली होती. दिल्लीमध्ये आज पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे.

देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे  प्रति लिटर दर

मुंबईमध्ये आज पेट्रोल 107.83 रुपये आणि डिझेल 97.45 रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये आज पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल  93.02 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये आज पेट्रोल 102.49 रुपये आणि डिझेल  94.39 रुपये प्रति लिटर

बंगळुरुमध्ये आज पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल  95.26 रुपये प्रति लिटर

लखनौमध्ये आज पेट्रोल 98.69 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लिटर

पाटणामध्ये आज पेट्रोल 104.57 रुपये आणि डिझेल  95.81 रुपये प्रति लिटर

जयपूरमध्ये आज पेट्रोल 108.71 रुपये आणि डिझेल  99.02 रुपये प्रति लिटर

गुरुग्राममध्ये आज पेट्रोल 99.46  रुपये आणि डिझेल  90.47 रुपये प्रति लिटर

हैदराबादमध्ये आज पेट्रोल 105.52 रुपये आणि डिझेल 97.96 रुपये प्रति लिटर

रांचीमध्ये आज पेट्रोल 96.45 रुपये आणि डिझेल 94.84 रुपये प्रति लिटर

पुणेमध्ये आज पेट्रोल 107.10 रुपये आणि डिझेल  95.54 रुपये प्रति लिटर

परभणी पेट्रोल दराने पार केले 110 रुपये

परभणीमध्ये पेट्रोल दराने 110 रुपये दर पार केला आहे. परभणीत आज पेट्रोलच्या दरात 25 पैशांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यात पेट्रोल दर 110 रुपये 15 पैसे तर  डिझेल 98.21 पैश्यांवर पोहोचले आहे.

दरम्यान, देशातील सर्व महानगरातील पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लड्डाख, सिक्किम आणि दिल्ली या ठिकाणी पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वरती गेले आहेत.

देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx   पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here