लखीमपूर (उत्तरप्रदेश)l तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश UP दौऱ्यावर आलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी Priyanka Gandhi शनिवारी लखीमपूर खेरी येथे पोहोचल्या. येथे त्यांनी ब्लॉक प्रमुख निवडणुकीसाठी अर्ज भरण्यादरम्यान गैरवर्तन झालेल्या दोन महिलांची भेट घेतली. प्रियांका गांधी अचानक लखीमपूर lakhimpur येथे आल्या. प्रियांका गांधी यांनी येथील पसगंवा गावात समाजवादी पक्षाच्या उमेदवार रितु सिंह आणि अनिता यादव यांच्याशी बोलून विरोधी पक्षांनाही संदेश दिला.
या भेटीनंतर प्रियांका गांधीनी भाजपाच्या गुंडांना शिक्षा झाली पाहिजे असे म्हटले. भेट देताना प्रियांका म्हणाल्या की एक महिला असल्याने मी अनिताला भेटायला आलो आहे. मी येथे पक्षाची नेता म्हणून आलेली नाही. उत्तर प्रदेश काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्या लखीमपूर भेटीचे फोटो शेअर करुन लिहिले की, “पक्षानुसार नाही तर दुखःनुसार नाते जपणाऱ्या नेत्याचे नाव प्रियांका गांधी आहे.” काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढी यांनी लिहिले की, फोव करून भेटणे आणि प्रत्यक्षात भेटणे यात मोठा फरक आहे.
कांग्रेस महासचिव श्रीमती @priyankagandhi जी ब्लॉक प्रमुख चुनाव में अभद्रता का शिकार हुईं प्रस्तावक अनीता यादव जी से पसगवां लखीमपुर में मुलाकात किया।
दल के हिसाब से नहीं दर्द के हिसाब से रिश्ता निभाने वाली नेता का नाम प्रियंका गांधी है। pic.twitter.com/8pCsytrNUQ
— UP Congress (@INCUttarPradesh) July 17, 2021
अर्ज दाखल करताना झाले होते गैरवर्तन
ब्लॉक प्रमुखांच्या उमेदवारीच्या वेळी अनेक ठिकाणी भाजपा आणि सपाच्या उमेदवारांमध्ये चकमक झाली. लखीमपूरमध्ये सपाच्या उमेदवार रितु सिंह यांचा उमेदवारी अर्ज देताना अनिता यादव यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलं. दोन-तीन जणांनी त्यांची साडी खेचण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. भाजपा समर्थकांनी महिलेशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला.
हेही वाचा
मोदींच्या सभेत स्वयंसेवकांच्या डोक्यावरच्या काळ्या टोप्याही काढायला लावल्या;शिवसेनेचा निशाणा!
Petrol-Diesel Price Today 17 July l पेट्रोलच्या दरात आज पुन्हा वाढ जाणून घ्या आपल्या शहरातील दर
[…] “भाजपाच्या गुंडांना शिक्षा झाली पाहि… […]
[…] “भाजपाच्या गुंडांना शिक्षा झाली पाहि… […]