पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव;भाजपाचा गोंधळ

रिपब्लिक टीव्ही ही वृत्तवाहिनी बंद करण्याची मागणी

shiv-sena-maharashtra-vidhan-sabha-arnab-goswami-republic-tv- pratap sarnaik-anil prab-bjp
shiv-sena-maharashtra-vidhan-sabha-arnab-goswami-republic-tv- pratap sarnaik-anil prab-bjp

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री व विधीमंडळाचा अवमान केल्याप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे. यावेळी भाजपच्या सदस्यांनी घोषणाबाजी करुन अर्णब गोस्वामींची पाठराखण केली.

अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री इतर नेत्यांचा एकेरी भाषेत केला होता उल्लेख

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला आहे. तसंच हेतुपुरस्सर आणि आक्षेपार्ह असून अर्णब गोस्वामींवर विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडण्यात आला. प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव मांडला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली.

रिपब्लिक टीव्ही ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी

प्रताप सरनाईक यांच्या या प्रस्तावानंतर विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला. या प्रस्तावानंतर भाजपानं गदारोळ घातला. दरम्यान, राज्य सरकार आणि जनतेचा अवमान असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. “अर्णब गोस्वामी हेतुपुरस्सर बोलत आहेत. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. ते कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. रिपब्लिक टीव्ही ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी,” अशी मागणी सरनाईक यांनी प्रस्ताव मांडताना केली.

अर्णब गोस्वामी हे सुपारी घेऊन काम करतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे

“अर्णब गोस्वामी हे न्यायाधीशआंच्या भूमिकेत आले असून स्वत: खटला चालवत आहेत. तेच निकालही देत आहेत,” असं म्हणत परिवहन मंत्री अनिल परब यांनी हल्लाबोल केला. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांना चौकट आखून देण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी हे स्वत:ला न्यायाधीश समजतात का? ते सुपारी घेऊन काम करतात. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पत्रकार संरक्षण कायदा आणला म्हणून त्यांनी काहीही करावं का?,” असा सवालही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here