NCP: जयंत पाटील म्हणाले नगरसेवक व्हायचे?…; मग क्रियाशिल सदस्य बनवा, तुमची ताकद कळेल!

सोमवारी औरंगाबादेत राष्ट्रवादी भवन हडको येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Jayant patil says NCP Want to be a corporator Then become an active member, your power will be known
Jayant patil says NCP Want to be a corporator Then become an active member, your power will be known

औरंगाबाद: तुम्हाला नगरसेवक व्हायचे? मग कामाला लागा…जिल्हा परिषद निवडणूक लढवायची मग क्रियाशिल सदस्य बनवा. आम्ही युवक काँग्रेसमध्ये काम करत असताना १०-१० हजार क्रियाशिल सदस्य बनवत होतो. त्यानंतर आम्ही आमदार झालो. जनतेतून निवडूण आलो, विधानपरिषदेतून आम्ही आमदार झालो नाही. शहरात तीन मतदार संघात किमान ४५ हजार क्रियाशिल सदस्य बनवले पाहिजे. तरच आपण आपली ताकद दाखवू शकू. पदाधिका-यांनी जास्त सदस्य बनवले पाहिजे. असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) यांनी पदाधिका-यांच्या आढावा बैठकीत दिला व पदाधिका-यांचे कान टोचले.

सोमवारी औरंगाबादेत राष्ट्रवादी भवन हडको येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, खासदार फौजिया खान, माजी मंत्री तथा संपर्क प्रमुख राजेश टोपे, पक्षनिरीक्षक अमरसिंह पंडित, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, आमदार विक्रम काळे, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमाणी, संघटक शेख मसूद, प्रदेश सचिव मुश्ताक अहेमद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन,कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा मेहराज पटेल, युवक काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष डॉ. मयूर सोनवणे यांची उपस्थिती होती.

‘वन बाय वन’ हजेरी…

कोणत्या पदाधिका-याने क्रियाशिल सदस्य नोंदणीसाठी किती पुस्तिका घेतल्या व किती सदस्यांची नोंद केली. याबाबत एक एक पदाधिका-याला विचारणा केली. यावेळी काही सदस्यांना समाधानकारक उत्तर देता आले तर काहींनी अजून दहा दिवसात होतील असे सांगितले.

महिला शहराध्यक्ष मेहराज पटेलांच्या कामाचे तोंडभरून कौतुक… राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा मेहराज पटेल यांनी क्रियाशील सदस्य नोंदणीत चांगली कामगिरी केली. तसेच वेळोवेळी पक्षाने दिलेले कार्यक्रम त्यांनी चांगल्या पध्दतीने हाताळले. क्रियाशील सदस्य नोंदणीबाबत त्यांनी सर्व माहिती प्रदेश कार्यालयाला तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा खासदार डॉ. फौजिया खान यांना दिली. अशी माहिती मेहराज पटेल यांनी बैठकीत दिली. त्यानंतर भाषणामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शहराध्यक्षा मेहराज पटेल यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच मेहराज पटेल यांच्याकडेच अध्यक्षपद ठेवावे असे सुचोवात केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.

 …मग क्रियाशिल सदस्य नोंदणी करा

नगरसेवक व्हायचे तर क्रियाशिल सदस्यांची नोंदणी तुम्हाला करावी लागेल. पदाधिका-यांनी जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करायला हवी. सर्व सेलच्या पदाधिका-यांनी किती किती पुस्तिका शहराध्यक्षांकडून घेऊन गेले आहेत त्याची माहिती जयंत पाटलांनी घेतली. प्रत्यक्ष नावे घेऊन सदस्य किती बनवले याची विचारपूस केली.

निष्ठावंताना भेटण्याचाशहराध्यक्षांना दिला सल्ला

राष्ट्रवादीचे जे निष्ठावंत जुने पदाधिकारी आहेत त्यांची भेट घ्या. त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना क्रियाशिल सदस्य नोंदणीसाठी तुम्ही त्यांना पुस्तिका द्या. त्यांची मदत घ्या. जेणेकरुन पक्षवाढीसाठी आपल्या ते कामी येतील. असा सल्ला जयंत पाटलांनी शहराध्यक्ष ख्वॉजा शरफोद्दीन यांना दिला.

माध्यमांना आढावा बैठकीत नो एंन्ट्री

माध्य प्रतिनिधिंना आढावा बैठकीत जयंत पाटलांनी थांबू दिले नाही. सभागृहाचे दार बंद करण्यात आले होते. ही पक्षाची आढावा बैठक आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींनी थांबू नये अशा सूचना जयंत पाटलांनी केल्या. त्यानंतर सभागृहाचे दार बंद करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here