Shivaji Park Dasara Melava Row : …तर शिवाजी पार्क उखडून टाकू; युवासेनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी!

mumbai-high-court-decision-on-shivsena-dasara-melava-at-shivaji-park-in-mumbai-news-update-today
mumbai-high-court-decision-on-shivsena-dasara-melava-at-shivaji-park-in-mumbai-news-update-today

Shivaji Park Dasara Melava Row : एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावर ठाम असून, दुसरीकडे शिवसेनेकडून पर्यायी मैदान म्हणून बीकेसी मैदानासाठी MMRDA ला पत्र लिहिले आहे. या सर्व वादामध्ये आता युवासेनेनेदेखील उडी घेतली आहे. सत्तेचा दुरुपयोग करुन शिंदे गटाने शिवतीर्थावर मेळावा घेण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण शिवतीर्थ मैदान कुदळ फावड्याने उखडून टाकू, असा गर्भित इशारा युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळींनी शिंदे सरकारला दिला आहे. त्यामुळे आता या इशाऱ्याला शिंदे गटाकडून काय उत्तर दिले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ठाकरे आणि शिंदे गटाकडून आगामी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरील परवानगीसाठी मुंबई महापालिकेला अर्ज केले आहेत. मात्र, अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या मैदानावर नेमका कुणाचा दसरा मेळावा होणार याचा प्रश्न कायम आहे.

तर, दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या शिंदे गटाच्या बैठकीत दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यात येईल यावर ठाम मत झाल्याची चर्चा आहे. यासाठी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचेही आदेश दिले गेले असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, आता या वादात युवासेनेनेदेखील उडी घेत शिवसेना ही फक्त उध्दव ठाकरेंच्या बापाची म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे. त्यामुळे उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय दुसरा कोणाचाही मेळावा शिवाजी पार्कवर होणार नाही आणि जर सत्तेचा दुरुपयोग करुन शिंदे गटाने शिवतीर्थावर मेळावा घेण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण शिवतीर्थ मैदान कुदळ फावड्याने उखडून टाकू, अशी धमकी वजा इशारा कोळी यांनी शिंदे गटाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here