भाजपच्या दुखणा-या पोटावर राज्यपालांनी सारखा लेप लावण्यात अर्थ नाही;संजय राऊतांचा टोला

shivsena-press-conference-at-sena-bhavan-today-latest-update-mp-sanjay-raut-talk-on-three-and-half-men-of-bjp-news-update
shivsena-press-conference-at-sena-bhavan-today-latest-update-mp-sanjay-raut-talk-on-three-and-half-men-of-bjp-news-update

मुंबई l भाजपने महाराष्ट्रात सत्ता गमावली ही वेदना मोठी आहे; पण त्यांच्या दुखणाऱ्या पोटावर राज्यपालांनी सारखा लेप लावण्यात अर्थ नाही. हे दुखणं किमान पुढची चार वर्षे राहणारच आहे. पण भाजपचे पोट दुखतेय म्हणून घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात हे गंभीर आहे,’ अशी उपरोधिक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

‘मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, बाणेदारपणा काय असतो ते दाखवून दिले. त्यांनी एकच मारला, पण सॉलिड मारला,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे. मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपनं आंदोलन केल्यानंतर लगेचच कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. ‘राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मग प्रार्थना स्थळे बंद का? मंदिरे बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का? की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? असे प्रश्न भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थित केले होते.

वाचा lCongress l काँग्रेसची आज भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभा!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजकीय भाषेतील पत्रावरून प्रचंड गदारोळ सुरू आहे. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून कोश्यारी यांच्या या भूमिकेचा व भाजपचाही जोरदार समाचार घेतला आहे. मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून ‘राजकीय’ भाषेत पत्र लिहिणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर शिवसेनेनं पुन्हा एकदा तोफ डागली आहे. ‘राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये ते भगतसिंह कोश्यारी यांनी दाखवून दिलं आहे.

वाचा l‘’राज्यपालांचे ‘आ बैल मुझे मार’ सारखे वर्तन, इथे बैल नसून ‘वाघ’आहे’’; शिवसेनेचा टोला

राज्यपालांचा वापर करून महाराष्ट्र सरकारवर हल्ले करणे त्यांना महागात पडले. या प्रकरणात भाजप व त्यांनी नेमलेले राज्यपाल इतके उघडे पडले आहेत की श्रीकृष्णाने वस्त्रे पुरविली तरी त्यांची अब्रू वाचणार नाही,’ अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे.  

‘भाजपचे लोक राजभवनात जातात व राज्यपालांना भरीस पाडतात. राज्यपाल पदाप्रमाणेच मुख्यमंत्री पदाचीही एक प्रतिष्ठा आहे. राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून ही प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी राज्यपालांवर जास्त आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठाच सुरू आहे. ही प्रतिष्ठा राखण्यासाठी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे राज्यपालांना माघारी बोलवतील,’ अशी अपेक्षाही शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here