मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ कारने आठ जणांना उडवले, पाच ठार!

speeding car blew up near Crawford Market in Mumbai, killing five
speeding car blew up near Crawford Market in Mumbai, killing five

मुंबई : मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भरधाव कारने आठ जणांना उडवले. या भीषण अपघातात 5 जण ठार झाले. तीन जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात ‘जनता कॅफे’समोर क्रॉफर्ड मार्केटजवळ (सोमवार 31 ऑगस्ट) रात्री नऊच्या सुमारास घडला.

क्रॉफर्ड मार्केटजवळ भरधाव एस्टीम कारने क्रॉफर्ड मार्केटसमोरुन येऊन पुलाखालून मेन रोड क्रॉस केला. गाडीने हॉटेल ‘जनता कॅफे’ला जोरदार धडक दिली. यावेळी रस्त्यावर आणि हॉटेलच्या समोर उभे असलेले अनेक जण गंभीर जखमी झाले.

जखमी झालेल्या 8 जणांना जवळच्या जे. जे रुग्णालयात नेण्यात आले. यामध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इतर तीन गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हॉटेलला धडक दिल्यानंतर कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. कार चालक दारू पिऊन गाडी चालवत होता अशी माहिती समोर येत आहे. कार चालकाला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here