उदनराजे कांदा निर्यातबंदीवर संतापले; सरकारला लिहीले पत्र, जसेच्या तसे…

bjp-udyanraje-bhosle-on-mahavikas-aghadi-morcha-governor-bhagat-singh-koshyari-chhatrapati-shivaji- maharaj-mumbai-news-update
bjp-udyanraje-bhosle-on-mahavikas-aghadi-morcha-governor-bhagat-singh-koshyari-chhatrapati-shivaji- maharaj-mumbai-news-update

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या बाजूने भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कांदा निर्यात बंदीचा विरोध केला आहे. कांदा निर्यातबंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी असल्याचे म्हणत मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवले आहे.

कांदा निर्यात बंदीमुळे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,स्वाभीमानी शेतकरी संघटना, शिवसेनेने केंद्राचा निषेध नोंदवला आहे. अनेक संघटनांकडून या निर्णयाचा विरोध करण्यात आला. आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की ,’केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे.

बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवून शेतकऱ्याना दिलासा द्यावा’ असे म्हणत उदयनराजे भोसलेंनी शेतकऱ्यांची बाजू मांडली आहे.

उदयनराजेंनी लिहिले की…

‘कांद्याचे उत्पादन करणारा शेतकरी हा गरीब आहे. कोरोना काळात खरं तर संपूर्ण देशाला सावरण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं. संपूर्ण देशाला अन्नधान्य आणि भाजीपाल्याची कमतरता भासू दिली नाही. आज जगभरात कांद्याला मोठी मागणी आहे. अशावेळी निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हजारो टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे. जेव्हा भाव कोसळतात तेव्हा कांदा फेकावा लागतो. पण आज कांद्याला चांगला भाव मिळत असताना असा निर्णय घेणे यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. त्यामुळे सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी त्वरीत मागे घ्यावी, जेणेकरुन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here