Cruise Party Raid Case l एनसीबीचा चित्रपट निर्माते इम्तियाज खत्रींच्या घरावर, कार्यालयावर छापा!

ncb-raid-at-film-producer-imtiaz-khatri-residence-and-office-in-cruise-ship-case-news-update
ncb-raid-at-film-producer-imtiaz-khatri-residence-and-office-in-cruise-ship-case-news-update

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने आज शनिवारी सकाळी मुंबईच्या वांद्रे भागात चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री (Imtiaz khatri) यांच्या घरी आणि कार्यालयावर छापे टाकले. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने इम्तियाज खत्रीवर मुंबई रेव्ह पार्टी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला आहे.

 एनसीबीने म्हटले आहे की, छाप्याची लिंक क्रूझ जहाजावरील छाप्याच्या प्रकरणाशी संबंधित आहे. यापूर्वीही इम्तियाज खत्रीवर ड्रग्जचा पुरवठा केल्याचा आरोप आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने इम्तियाज खत्रीवर ड्रग प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला आहे. इम्तियाज खत्री हा मुंबईच्या एका प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा आहे. इम्तियाज खत्रीचे बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सशी जवळचे संबंध आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणातही ड्रग्जचा पुरवठा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यावेळी त्याची अनेक वेळा चौकशीही करण्यात आली.

हेही वाचा 

कश्मीरातील हिंदूंना वाचविण्यात तुम्ही अपयशी ठरला;शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here