म्यानमारमध्ये जबरदस्ती सत्ता ताब्यात घेणाऱ्या लष्कराला अमेरिकेने दिला ‘हा’ इशारा

us-warns-of-response-after-myanmar-military-aung-san-suu-kyi
us-warns-of-response-after-myanmar-military-aung-san-suu-kyi

अमेरीका: म्यानमारमध्ये जबरदस्तीने सत्ता ताब्यात घेणाऱ्या लष्कराला अमेरिकेने इशारा दिला आहे. म्यानमारच्या लोकशाहीवादी सर्वोच्च नेत्या आंग सान सू की यांच्यासह ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांना सोडून द्या, असे अमेरिकेने म्यानमारच्या लष्कराला सांगितले आहे. वॉशिंग्टनकडून प्रत्युत्तर मिळेल, असा इशाराही दिला आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीत घोटाळा झाल्याच्या मुद्यावरुन लष्कर आणि नागरी सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव वाढत गेला, अखेर आंग सान सू की आणि देशाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक करण्यात आली.

“नुकत्याच लागलेल्या निवडणूक निकालात कोणताही बदल करणे किंवा म्यानमारच्या लोकशाही प्रक्रियेत अडथळा आणण्याला अमेरिकेचा विरोध आहे. सत्ता ताब्यात घेण्याचे पाऊल मागे घेतले नाही, तर जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करु” असा इशारा व्हाइट हाऊसमधील प्रवक्त्या जेन साकी यांनी दिला.

 “लष्कर आणि सर्व संबंधित पक्षांना आम्ही लोकशाही नियमांचे पालन करण्याची आणि ताब्यात घेतलेल्या सर्वांची सुटका करण्याची विनंती करतो” असे जेन साकी म्हणाल्या. आंग सान सू की यांच्या एनएलडी पक्षाने निवडणुकीत सहज विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत घोटाळा झाल्याच्या मुद्यावरुन तणाव निर्माण झाला होता. लष्कराने मागच्याच आठवडयात सत्ता ताब्यात घेण्याचे संकेत दिले होते.

यह भी पढ़ें: WhatsApp में एड हुए नए फीचर, Group Admin को मिली यह नई पावर

सत्ता ताब्यात घेतल्यानंतर लष्कराने देशात एका वर्षासाठी आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे लष्कराचे कमांडर इन चीफ मिन आंग ह्लाईंग यांच्या हाती सत्तेची सुत्रे आली आहेत. म्यानमारच्या राजकारणातील महत्वाच्या नेत्या असलेल्या आंग सान सू की या ७५ वर्षीय महिला नेत्या २०१५ मध्ये राष्ट्रीय निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवत सत्तेत आल्या होत्या.

तत्पूर्वी त्यांना मोठ्या कालावधीसाठी राहत्या घऱी नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. यामुळे त्या आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रकाशझोतात आल्या होत्या. मात्र, म्यानमारमधील रोहिंग्यांच्या मुद्द्यावरुन त्यांच्या प्रतिमेला तडा गेला होता.

  

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here