गुलाम नबी आझादांसह ‘या’ नेत्यांची सरचिटणीसपदावरून उचलबांगडी

लेटर बॉम्बनंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

congress-ghulam-nabi-azad-axed-general-secretary-post
congress-ghulam-nabi-azad-axed-general-secretary-post

नवी दिल्ली :  काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी शुक्रवारी पक्षाच्या कार्यकारी समितीत मोठे बदल केले. गुलाम नबी आझाद, मोतीलाल वोरा, अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खर्गे आणि लुइजिन्हो फालेरिओ यांना सरचिटणीस पदावरून काढून टाकण्यात आले आहे. यापैकी गुलाम नबी आझाद सोनिया यांना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांपैकी एक होते. आजच्या फेरबदलमुळे काँग्रेसमध्ये सर्वांनाच धक्का बसला.

काँग्रेसच्या मोठ्या 23 नेत्यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पूर्ण वेळ नेतृत्वाची मागणी केली होती. 7 ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रामध्ये जो ‘क्षेत्रात सक्रिय राहील आणि त्याचा प्रभाव दिसेल’ अशा पूर्णवेळ नेतृत्वाची मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली होती. याबाबत सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली होती.

काँग्रेसच्या एक गटाला गांधी कुटुंबियांचे नेतृत्व नको होते. तर एक गटाला गांधी कुटुंबातील व्यक्तिलाच काँग्रेसची धूरा सांभाळण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी होत आहे. 23 नेत्यांनी सोनिया गांधींना लेटर पाठवल्यानंतर काँग्रेसमध्ये आज मोठे बदल करण्यात आले आहेत.

आझाद यांना ते विधान भोवले

गुलाम नबी आझाद राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. सीडब्ल्यूसीच्या बैठकीत गुलाम नबी हे राहुल गांधींच्या कथित विधानाला विरोध करणार्‍यांमध्ये आघाडीवर होते. त्यामुळे त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज होते.

या ज्येष्ठ नेत्यांना डच्चू

मोतीलाल वोरा : गांधी घराण्यातील ते सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक आहेत. बर्‍याच काळापासून पक्षाचे कोषाध्यक्ष आहेत. आता ते 92 वर्षांचे आहेत.

अंबिका सोनी : केंद्रीय मंत्री राहिल्या. सोनिया गांधींच्या विश्वासू होत्या. आता त्या 77 वर्षांच्या आहे.

मल्लिकार्जुन खर्गे : गेल्या लोकसभेत ते काँग्रेसचे नेते होते. 2019 मध्ये निवडणुकीत पराभूत. आता 78 वर्षांचे आहेत.

लुईझिनहो फालेरोः गोव्याचे माजी मुख्यमंत्री होते. आता ते 69 वर्षांचे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here