आमदार रवी राणांचे कारागृहाच्या आत तर नवनीत राणांचे बाहेर आंदोलन

आमदार रवी राणांसह १६ कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी

mla-ravi-rana-arrested-mp-navneet-rana-protest-outside
mla-ravi-rana-arrested-mp-navneet-rana-protest-outside

अमरावती l आमदार रवी राणा MLA Ravi Rana यांच्यासह इतर १६ कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडीत आहेत. खासदार नवनीत  Navneet Rana राणा यांनी पती रवी राणा यांची सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

महाराष्ट्रात काही भागांत सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे Heavy rainfall शेतकऱ्यांचे पिकं वाहून crops damage गेली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत, वीज बिल माफ करावी अशी मागणी करत आमदार रवी राणा MLA Ravi Rana यांनी शुक्रवारी रास्तारोको आंदोलन केले होते.

हेही वाचा l Temples reopen in Maharashtra l सोमवारपासून राज्यातील सर्व धार्मिकस्थळे उघडणार

आमदार रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने रात्री उशिरा त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे आमदार रवी राणा यांची दिवाळी कारागृहात जाणार आहे.

आमदार रवी राणा यांना कारागृहात पाठवल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी खासदार नवनीत राणा या कारागृहाच्या बाहेर दाखल झाल्या. मात्र, कारागृह प्रशासनाने खासदार नवनीत राणा यांना रवी राणा यांची भेट घेण्यास नकार दिला. यानंतर खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाच्या बाहेरच रस्त्यावर बसून आंदोलनाल केले.

आमदार रवी राणा यांनीही कारागृहात अन्नत्याग आंदोलन सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा न्यायालयात हजर केले असता आमदार रवी राणा यांच्याकडून जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता मात्र, न्यायालयाने तो नाकारला.

हेही वाचा l Bigg Boss 14 l ‘जान सानू’ने मर्जीविरोधात किस केलं?; निक्की तांबोळीचा आरोप

आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्याने त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं, “शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here