Temples reopen in Maharashtra l सोमवारपासून राज्यातील सर्व धार्मिकस्थळे उघडणार

maharashtra-government-allowed-to-reopen-temples-and-other-religious-places-from-monday
maharashtra-government-allowed-to-reopen-temples-and-other-religious-places-from-monday

मुंबई l कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मीक स्थळ बंद होती. Temples reopen in Maharashtra आता राज्यभरातील मंदिरं, मशीदीसह गुरुव्दारा,चर्च इतर धार्मिकस्थळे सोमवारपासून उघडली जाणार आहे. याबाबतचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

दिवाळी पाडव्यापासून राज्यभरातील धार्मिक स्थळ उघडण्यात येणार आहेत. भाविकांना सोशल डिस्टंसिंग, मास्क परिधान करणे अनिवार्य आहे यासोबतच गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंदिरे आणि इतर धार्मिकस्थळे उघडण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून भाविकांकडून होत होती. अखेर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने मंदिरे उघडण्यास मुभा दिली आहे.

हेही वाचा l राहुल गांधी प्रकरणी बराक ओबामांवर शिवसेनेचा हल्लाबोल

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णायामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून भाविकांसाठी ही एक दिवाळी भेटच ठरली आहे. कोरोना संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिरे बंद होती.

हेही वाचा l रुग्णवाहिकेला भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

मंदिरातील पूजारी, फुले-प्रसाद विक्रेत्यांच्या उदर्निर्वाहाचाही प्रश्न उपस्थित झाला होता. हॉटेल, इतर व्यवसाय सुरू केल्याने मंदिरे सुरू कऱण्यात यावीत अशी मागणी जोर धरत होती. ही मागणी आता राज्य सरकारने मागणी केली आहे. 

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here