Maharashtra Lockdown l महाराष्ट्रात शुक्रवार ते सोमवारपर्यंत कडक लॉकडाउन

राज्यात उद्यापासून 30 एप्रिलपर्यंत कडक नियम लागू

maharashtra-government-declare-corona-omicron-new-guidelines-today-after-cm-uddhav-thackeray-taking-meeting-with-task-force-omicron-and-corona-cases-increased-in-state-news-update
maharashtra-government-declare-corona-omicron-new-guidelines-today-after-cm-uddhav-thackeray-taking-meeting-with-task-force-omicron-and-corona-cases-increased-in-state-news-update

मुंबई: मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांत रुग्णसंख्येनं मोठी उसळी घेतल्यानं महाविकास आघाडी सरकारने आज लॉकडाऊन करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार 9 एप्रिल रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाउन असणार आहे. अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.  maharashtra-Lockdown-cm-uddhav-thackeray-maha-vikas-aghadi-covid-news-updates

राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, अशी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री मलिक नवाब मलिक यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन करण्याचा इशारा दिला होता.

शनिवारी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांसह विविध क्षेत्रातील संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत लॉकडाउनसंदर्भातील निर्णय घेतला आहे. 

राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उपद्रव झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील स्थितीही चिंताजनक असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांनी नियमांचं पालन न केल्यास लॉकडाउन लावू असा इशारा दिला होता. दोन दिवसात निर्णय घेऊ असं ठाकरे म्हणाले होते. 

लॉकडाउनचे दिले होते संकेत

शुक्रवारी जनतेशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी दोन सत्रांत उद्योजकांसह प्रसारमाध्यमे, व्यायामशाळा चालक, मराठी नाट्य निर्माता संघ तसेच त्यानंतर राज्यातील मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृह चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

यावेळी स्वयंशिस्त पाळली असती, तर आजची स्थिती आली नसती. लसीकरणातही आपण सर्वात पुढे आहोत. नुकसान तर पूर्ण राज्याचे होणार आहे. ‘जिंदगी, जान उसके बाद काम,’ याप्रमाणे पुढे जावे लागेल. त्यासाठी आता काही पावले उचलावीच लागतील. परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावे लागतील. लोकांमध्ये करोनाविषयी जागरूकता निर्माण करावी लागेल. भीती गेली हे चांगले झाले. पण त्यामुळे बेफिकिरी वाढली आहे. या विषाणूचा संसर्ग धोकादायक हे सांगण्याची वेळ आली आहे, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनबद्दलचे संकेत दिले होते. तसेच सरकारच्या निर्णयाला सहकार्य करण्याची विनंती सर्व क्षेत्रातील प्रतिनिधींना केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here