मुंबई l ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी अभिनेता अर्जुन रामपाल Arjun Rampal अमली पदार्थविरोधी पथकाच्या NCB कार्यालयात दाखल झाला. दोन तासांपासून अर्जुन रामपालची चौकशी सुरु आहे. सोमवारी अर्जुन व त्याची लिव्ह इन पार्टनर, मॉडेल गॅब्रीएला डेमेट्रीएड्स यांच्या निवासस्थानी एनसीबीने छापा घालून शोधाशोध केली होती.
या कारवाईत काही प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याचा दावा एनसीबीने NCB केला होता. बुधवारी गॅब्रीएलाची एनसीबीकडून सुमारे सहा तास चौकशी झाली. त्यानंतर आता अर्जुनची चौकशी होणार आहे.
गेल्या महिन्यात एनसीबीने NCB गॅब्रीएलाच्या भावाला लोणावळा येथून अटक केली होती. त्याच्याकडूनही काही प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत केले होते.
हेही वाचा l ‘’किरीट सोमय्या गुन्हेगार अर्णब गोस्वामीला पाठीशी का घालताय?’’;नाईक कुटुंबियांचा सवाल
अमली पदार्थाचे सेवन, अमली पदार्थ विक्रेत्यांशी संपर्क आणि बॉलीवूडशी संबंधित व्यक्तींना अमली पदार्थाचा पुरवठा असा आरोप एनसीबीने त्याच्यावर ठेवला होता.
हेही वाचा l ‘’सोमय्या फालतू आणि फडतूस, हातात कागद घेऊन गिधाडासारखा फडफडतोय’’ : संजय राऊत
रविवारी चित्रपट निर्माते फिरोज नाडीयाडवाला यांच्या पत्नी शबाना सईद यांना एनसीबीने NCB अटक केली होती. नाडीयाडवाला यांच्या जुहू येथील बंगल्यातून गांजा हस्तगत केल्याचा दावा एनसीबीने केला होता.