औरंगाबादेत वाळूजमध्ये कंपनीत अग्नीतांडव, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू!

Aurangabad-chatrapati-sambhajinagar-massive-fire-breaks-out-at-waluj-midc-6-workers-die-news-update-today
Aurangabad-chatrapati-sambhajinagar-massive-fire-breaks-out-at-waluj-midc-6-workers-die-news-update-today

औरंगाबाद: वाळूज औद्योगिक वसाहतीत हात मौजे बनवणाऱ्या सनशाइन इंटरप्राईजेस कंपनीला रविवारी रात्री १२ ते ३० च्या सुमारास भीषण आग लागून सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. पाच ते सात कामागारांनी वरच्या मजल्यावरून उड्या मारून जीव वाचवले. आग एवढी भीषण होती की, आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल साडे तीन ते चार तासाचा कालावधी लागला.

मुस्ताक शेख (६५), कौसर शेख (३२), इक्बाल शेख (१८), ललन सिंह (५५), रियाज शेख (३२) व मरगुल शेख (३३) या सहा कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. सर्व कामगार कंपनीत झोपले होते.  कंपनीला भीषण आग लागल्याने आणि बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग बंद झाल्याने कंपनीच्या वरच्या रूम मध्ये झोपलेले अली अकबर जाहिद हुसेन (२८), मोहम्मद अफरोज आलम (२३), मोहम्मद हैदर अली (३२), मोहम्मद इरशाद व दिलीपकुमार चंद्रिकाकुमार (२९) हे कामगार भयभीत झाले. आगीच्या झळा त्यांना सहन होत नसल्याने जीव वाचवण्यासाठी ते लगतच्या झाडावर चढले आणि खाली उड्या मारल्या. त्यामुळे ते बालंबाल बचावले.

वाळूज औद्योगिक वसाहतीत सी सेक्टर प्लॉट नंबर २१६  मध्ये साबेर शब्बीर शेख रा. किराडपुरा, छत्रपती संभाजीनगर यांची सनशाइन इंटरप्राईजेस नावाची कंपनी ५ हजार स्केअर फुटात पक्के बांधकाम व टिनशेड मध्ये बांधण्यात आलेली आहे. या कंपनीमध्ये हातमौजे बनवण्याचे काम चालते. वरच्या मजल्यावर कामगार झोपलेले होते. रात्री १२.३० च्या सुमारास अचानक आग लागली. या कंपनीत हात मोजे बनवण्याचे काम केल्या जाते. या कंपनीत बिहार येथील असमुद्दिन मुस्ताक शेख हे ठेकेदार आहेत. ठेकेदारासह त्यांची पत्नी इसमत परवीन शेख, मुलगा मोहम्मद मुजमीन शेख, मुलगी आयेशा शेख यांच्यासह १८ कामगार काम करत होते. बिहार राज्यातील असलेले हे कामगार कंपनीतच राहत होते. शनिवारी रोजी काम संपवून सर्वजण जेवण करून झोपल्यानंतर रविवारी १२.३०  वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. त्यावेळी सर्वजण झोपलेले होते. आगीच्या झळा लागल्याने काही कामगार झोपेतून उठले आणि बाहेर पळाले. पाहता पाहता ही आग भडकल्याने सहा कामगार आत मध्येच अडकले. त्यांच्याबरोबर एक पाळीव कुत्रा सुद्धा होता. बाहेर येण्याचा मार्ग बंद झाल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. सुमारे तीन तास अडकून पडलेले हे कामगार आगीच्या भक्षस्थानी सापडले.

आग लागल्याची माहिती मिळताच वाळुज अग्निशमन दलाचे २ बंब, बजाज ऑटोचा १, मनपाचा २, पदमपुरा, चिकलठाणा अग्निशमन दलाचे प्रत्येकी २ अशा एकूण ६ बंबांसह वाळुज एमआयडीसी पोलिसांनीनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान १०८ च्या ४ रुग्णवाहिका आल्या. एक बाजू वगळता सर्व बाजूने बंदिस्त असलेल्या या कंपनीतील आग जास्तच भडकल्याने अथक परिश्रम करून अग्निशमन दलाच्या जवानांनी  नियंत्रण मिळवण्याचे काम केले. तोपर्यंत जवळजवळ साडेतीन तास उलटले होते. तरीही आग सुरूच होती. प्रथम आत मध्ये अडकून पडलेल्या सहा कामगारांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. एक कुत्राही या आगीत होरपळून मृत्यूमुखी पडला. सर्व मयत कामगारांचे मृतदेह घाटी दवाखान्यात रवाना करण्यात आले. काम करणाऱ्यांमध्ये बिहार राज्य, मधुबली जिल्हा, ठाणा मदनिया, पोस्ट मिर्झापूर, पंचायत दलोकर या गावाचे आहेत. त्यातील १ पश्चिम बंगाल व १ शेजारच्या गावातील आहे.

यांनी केले शर्तीचे प्रयत्न

वाळुज औद्योगिक वसाहतीत आग लागून अनेक कामगार अडकल्याची माहिती मिळताच वाळूज पोलीस स्टेशन – डॉ. सुशील राऊत, पायलट मंगल राठोड, जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्र – डॉ. अनंत पाटील, पायलट मुसा शेख, भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र – डॉ विशाल आगळे, पायलट नितीन लांडगे, बन्सीलालनगर येथील १०८ रुग्णवाहिकेचे- डॉ. काळे, चंदन राजपूत

डॉ. हर्षल कोठारी, फहीम खान हे १०८ रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धावले. या डॉक्टर आणि पायलटने शर्तीचे प्रयत्न करत आगीत होरपळलेले व जखमींना घाटीत दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here