ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधातील कुस्तीपटूंचं आंदोलन मागे; साक्षी मलिक ट्वीट करत म्हणाली, “आता…”

battle-to-continue-in-court-wrestlers-call-off-protest-after-5-months-say-sakshi-malik-news-update
battle-to-continue-in-court-wrestlers-call-off-protest-after-5-months-say-sakshi-malik-news-update

नवी दिल्ली: कुस्तीगीर महासंघाचे मावळते अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. याप्रकरणात ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणी करत गेल्या ५ महिन्यांपासून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु होतं. पण, न्यायालयात चार्जशीट दाखल झाल्याने रस्त्यावरील लढाई थांबवण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला आहे. याबाबत कुस्तीपटू साक्षी मलिकने माहिती दिली आहे.

ट्वीट करत साक्षी मलिक म्हणाली की, “कुस्तीपटूंची ७ जूनला सरकारबरोबर बैठक झाली. या बैठकीत सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी तपास पूर्ण करत १५ जूनला चार्जशीट दाखल केलं आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत कुस्तीपटूंची रस्त्यावरील लढाई आता न्यायालयात सुरु राहिल.”

“कुस्ती महासंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कुस्तीसंघाची ११ जुलैला निवडणूक होऊ शकते. सरकाराने दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीची आम्ही वाट पाहू,” असेही साक्षी मलिकने म्हटलं आहे.

महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आला होता. त्याप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करत कुस्तीपटू पाच महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले होते. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयात चार्जशीटही दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here