Covid19 Second Wave Maharashtra l महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं मुख्य सचिवांना पत्र

corona-covid-19-omicron-infection-patient-recovery-latest-updates-of-maharashtra-Friday-7-january-2022-news-update
corona-covid-19-omicron-infection-patient-recovery-latest-updates-of-maharashtra-Friday-7-january-2022-news-update

मुंबई: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली Maharashtra Covid19  Second Wave असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. यासंबंधीचं पत्र केंद्रीय समितीने राज्याचे मुख्य सचिव Chief Secretory सीताराम कुंटे Sitaram Kunte यांना पाठवलं आहे. केंद्रीय सचिव Chief Secretary राजेश भूषण Rajesh Bhushan यांनी लिहिलेल्या या पत्रात राज्यात कोरोना स्थितीवर गंभीर पावलं उचलली जात नसल्याची टिप्पणी देखील केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय समिती राज्याच्या दौऱ्यावर आली होती. त्यावेळी कोरोनाविषयक सुविधांचा आढावा या समितीने घेतला होता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ही सुरूवात असल्याचं या पत्रात नमूद

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी राज्याच्या मुख्य सचिवांनी पत्र लिहिलं आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ही सुरूवात असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये कोरोनासंदर्भातील परिस्थितीवर राज्य सरकारकडून गंभीर पावलं उचलली जात नसल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा: सचिन वाझेंच्या सोसायटीमधून CCTV फुटेज गायब; मात्र NIA ला मिळाले पुरावे!

दोन आठवड्यांपूर्वी 7 मार्च ते 11 मार्च दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची एक टीम राज्याच्या दौऱ्यावर आली होती. या टीमने 8 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. केंद्राच्या टीमने मुंबईतील एस आणि टी वॉर्डमध्ये तसेच ठाणे, नाशिक, धुळे औरंगाबाद, जळगाव याठिकाणी पाहणी केली होती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि आयसोलेशन-क्वारंटाईन फॅसिलिटीजची काय परिस्थिती आहे याचा आढवा या टीमनं घेतला होता.

हेही वाचा: Zomato Delivery प्रकरणात पुन्हा ट्विस्ट, त्या महिलेवर अखेर गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here