Coronavirus In India l चिंता वाढली; भारतात मे महिन्यात दररोज पाच हजार कोरोना बळींची भीती

वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेटरिक्स एण़्ड एवोल्यूशनच्या संशोधनात दावा

corona-virus-infection-without-mask-news-update
corona-virus-infection-without-mask-news-update

वॉशिंग्टन: भारतात कोरोना थैमान सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात बाधितांचा आकडा वाढत असताना चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुढील मे महिन्यात भारतात कोरोनाची लाट आणखी जोर पकडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भारतात दररोज पाच हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान भारतातील तीन लाख नागरिकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागण्याची शक्यता आहे.coronavirus-in-india-covid-deaths-in-india-could-peak-by-mid-may-at-over-5000-per-day-said-us-study-news-update

वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेटरिक्स एण़्ड एवोल्यूशनच्यावतीने करण्यात आलेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. १५ एप्रिल रोजी प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, भारतात कोरोनाच्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात लसीकरण मोहिमेवर भर देण्यात येणार असल्याचे म्हटले.

हेही वाचा : Anil Deshmukh l अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल, मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी

भारतात आगामी दिवसात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. या संशोधनासाठी भारतातील मृत्यू आणि संसर्गाच्या दराचा अभ्यास करण्यात आला. यावर्षी मे महिन्याच्या मध्यात भारतातील करोना बळींची संख्या ५६०० इतकी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

१२ एप्रिल ते १ ऑगस्ट या काळात अतिरिक्त तीन लाख २९ हजार मृत्यू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधनानुसार, सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या दरम्यानच्या काळात भारतात कोरोनाबाधितांच्या दररोजच्या संख्येत घट होती. मात्र, आता त्यात वाढ होताना दिसत आहे. दररोज करोनाबाधित आढळण्याचा दर मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या एप्रिल महिन्यात दुप्पट असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Ajwain Tea Benefits | ‘ओव्या’चा चहा प्यायल्याने शरीराला होतील हे फायदे

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात नवीन कोरोनाबाधित आढळण्याच्या प्रमाणात ७१ टक्के वाढ दिसून आली. कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे दररोज होणाऱ्या करोना मृत्यूंचे प्रमाण ५५ टक्के वाढले असल्याचे संशोधनात म्हटले आहे. या संशोधनानुसार, देशव्यापी लसीकरणामुळे जुलै महिन्याच्या अखेरिस ८५ हजार ६०० जणांचे प्राण वाचवले जाऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here