Ramdev Baba : महिलांच्या कपड्यांविषयीच्या ‘त्या’ विधानामुळे रामदेव बाबा अडचणीत; महिला आयोगाची नोटीस!

“अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील शंभर वर्षं त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण, त्या नेहमी आनंदी राहतात. जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे, तसाच तुमच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे”, असं रामदेव बाबा म्हणाले.

yog-guru-ramdev-baba-controversial-statement-on-women-clothing-notice-news-update-today
yog-guru-ramdev-baba-controversial-statement-on-women-clothing-notice-news-update-today

मुंबई: योगगुरू रामदेव बाबा (You guru Ramdev Baba) हे अनेकदा त्यांच्या राजकीय भूमिकांमुळे चर्चेत किंवा वादात सापडल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांनी काळ्या पैशांविषयी केलेल्या विधानाचीही चर्चा झाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा रामदेव बाबा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे ते अडचणीत सापडले असून थेट राज्य महिला आयोगाने यासंदर्भात रामदेव बाबांना नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे रामदेव बाबांनी हे विधान केलं, तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही (Amruta Fadnavis) उपस्थित होत्या. त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होताना पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले होते रामदेव बाबा?

शुक्रवारी रामदेव बाबांनी ठाण्यात घेतलेल्या योग शिबिरामध्ये हा सगळा प्रकार घडला. यावेळी अमृता फडणवीसांच्या उपस्थितीत रामदेव बाबांनी हे विधान केल्यामुळे त्यावरून राजकीय चर्चाही झडू लागल्या आहेत. “अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील शंभर वर्षं त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण, त्या नेहमी आनंदी राहतात. जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे, तसाच तुमच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे”, असं रामदेव बाबा म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here