जीनिव्हा : करोना साथीवर मात करण्यास किमान दोन वर्षे लागू शकतात. असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी व्यक्त केले आहे. (coronavirus-pandemic-could-be-over-within-two-years-who-chief ) त्यासाठी लशीसह उपलब्ध सर्व साधनांचा वापर करावा लागेल असंही घेब्रेसस यांनी सांगितले.
कोरोनाची साथ संपवण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार असला तरी तो १९१८ मधील स्पॅनिश फ्लूची साथ घालवण्यास लागलेल्या काळापेक्षा कमीच म्हणता येईल. दरम्यान, जगभरात २२.८५ दशलक्ष लोकांना करोनाचा संसर्ग झाला असून आठ लाख लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. १९ लाख लोक करोनातून बरे झाले आहेत.
अमेरिकेनंतर करोनाबळीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर…
ब्राझीलमध्ये ३०,३५५ नवे रुग्ण सापडले असून, शुक्रवारी १०५४ जणांचा मृत्यू झाला. तेथील एकूण रुग्णसंख्या ३५,३२,३३० वर पोहोचली आहे. मृतांची संख्या १ लाख १३ हजार ३५८ झाली असून, अमेरिकेनंतर करोनाबळीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे.
’ स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांनी करोना प्रतिबंधासाठी फारशी कठोर धोरणे न राबवल्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. स्वीडनने इतर युरोपीय देशांसारखे कडक निर्बंध लागू केले नव्हते. स्वीडनमधील मृतांची संख्या नॉर्वे, फिनलंड, डेन्मार्क यांच्यापेक्षा अधिक आहे.