‘क्राइम रेकॉर्ड’ ‘क्यूआर कोड’वर!

औरंगाबादेत पोलिस ठाण्यात राज्यातील पहिलाच प्रयोग

crime-record-on-qr-code-the-first-experiment-in-the-state-at-the-police-station-in-chhatrapati-aurangabad-sambhajinagar-news-update-today
crime-record-on-qr-code-the-first-experiment-in-the-state-at-the-police-station-in-chhatrapati-aurangabad-sambhajinagar-news-update-today

औरंगाबाद: पोलिस ठाण्यांमध्ये जुने रेकॉर्ड सांभाळताना अधिकाऱ्यांची दमछाक होत असते. इतकेच नव्हे, तर ठाण्यातील एखाद्या तपास अधिकाऱ्याकडून आजवर संबंधित गुन्ह्यांच्या फायलीही गहाळ होतात.

मात्र, यावर छावणी पोलिस ठाण्याने अगदीच कमी खर्चात छान संकल्पना प्रत्यक्षात उतरविली असून केवळ एका क्यूआर कोडच्या स्कॅनवर वर्षानुवर्षांचे कोणत्याही प्रकारचे रेकॉर्ड आता ‘ओपन’ होणार आहे.

यातून केवळ वेळच वाचतो असे नाही, तर एखादे क्राइम रेकॉर्ड पाहिजे असलेल्या ठाण्यातील अधिकाऱ्याला जशाच्या तसा ‘सेव्ह’ ठेवणेही आपोआपच बंधनकारक झाले आहे. हा प्रयोग राज्यात पहिला असल्याचा दावाही पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी केला.

मोठ्या आकाराच्या लाल कपड्यात वर्षानुवर्षांचे कागदी रेकॉर्डचे गठ्ठे बांधलेले आपणास सरकारी कार्यालयात दिसतात. पोलिस ठाणेही यास अपवाद नाही. मात्र, निरीक्षक  कैलास देशमाने यांनी छावणी पोलिस ठाण्याचा पदभार घेताच त्यांनी बघितलेली परिस्थिती बदलण्याचे ठरविले अन् तिथून सुरू झाला ‘क्यूआर कोडचा’ प्रवास.

 रेकॉर्ड जतन करण्याची मुदत (वर्षे)

भाग अ, भाग ब भाग दोनमधील गुन्ह्यांचे रेकार्ड ३० वर्षे

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचे दस्तऐवज ३० वर्षे

डे बुक २० वर्षे

फरार आरोपींच्या नावांची आणि वर्णनांची सूची २० वर्षे

चोरीशिवाय भादंवि १२, १७ च्या केस डायऱ्या १५ वर्षे

मोठ्या जखमा, जबरी संभोग

(उघडकीस पण मुद्देमाल नसलेले) १० वर्षे

आरोपी अटक रजिस्टर १० वर्षे

आवक जावक बाननिशी १० वर्षे

स्टेशन डायरी ५ वर्षे

मुद्देमाल रजिस्टर ५ वर्षे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here