गॅसचा पुन्हा भडका l गँस सिलिंडरच्या किमती वाढवल्या; जाणून घ्या नवे दर

commercial-gas-cylinder-price-hiked-by-rupees-43-update
commercial-gas-cylinder-price-hiked-by-rupees-43-update

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीमध्ये सर्वसामान्यांची होरपळ सुरु झाली आहे. देशात पेट्रोल 100 रुपयांवर गेले आहे तर डिझेलचे दर 90 रुपयापर्यंत पोहोचले आहे. पेट्रोल आणि डीझेलच्या किमती वाढत असतानाच सामान्य नागरिकांच्या खिशाला आता गॅसने सुद्धा कात्री लावली. आजपासून गॅसच्या किमतींमध्ये 25 रुपयांची वाढ LPG price hiked by Rs. 25 Per Cylinder second time in last four days केली आहे. दरवाढीमुळे गॅस ८१९ रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला आहे.

दिल्लीत आता सबसिडी नसलेला LPG सिलेंडर 819 रुपयांत मिळत आहे. आधी याची किंमत 794 रुपये एवढी होती. 2021 मध्ये सुरुवातीच्या दोन महिन्यांतच घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये तब्बल 125 रुपयांची वाढ झाली आहे. 1 जानेवारी रोजी जे सिलेंडर 694 रुपयांना मिळत होते ते आता 819 रुपयांवर पोहोचले आहे.

फेब्रुवारीत तीनदा महागले
फेब्रुवारी महिन्यात घरातील एलपीजी सिलेंडरच्या किमती तीनदा वाढवण्यात आल्या आहेत. सरकारने 4 फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये 25 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी त्यात 50 रुपयांची आणि 25 फेब्रुवारी रोजी पुन्हा 25 रुपयांची वाढ केली. अर्थात एका महिन्यातच सिलेंडरचे भाव 100 रुपयांनी वाढवण्यात आले.

डिसेंबरपासून आतापर्यंत 225 रुपयांनी महागले
1 डिसेंबर 2020 रोजी गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपयांवरून 644 करण्यात आली. 1 जानेवारी रोजी त्यात पुन्हा 50 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे एक घरगुती स्वयंपाकाचे सिलेंडर 694 रुपयांत येत होते.

हेही वाचा:राज्यपाल, विरोधी पक्ष राजधर्म कधी पाळणार?;शिवसेनेचा भाजपला सवाल

फेब्रुवारी महिन्यात तीनदा एकूणच 100 रुपये वाढवण्यात आले. अशा प्रकारे 25 फेब्रुवारी रोजीच गॅस सिलेंडरची किंमत 794 रुपये झाली. आता 1 मार्चपासून आणखी 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सरकारकडून घरगुती LPG च्या वर्षातून 12 टाक्यांवर सबसिडी अर्थात सवलत दिली जाते.

कमर्शिअल सिलेंडरच्या दरातही वाढ
19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरच्या किमती सुद्धा 90.50 रुपयांनी महागल्या आहेत. दिल्लीत आता कमर्शिअल सिलेंडरची किंमत 1614 रुपये तर मुंबईत 1563.50 रुपये करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here