औरंगाबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांची केंद्र सरकारच्या (Central Government) गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार विषयक स्थायी समितीवर (Standing Committee on Housing and Civic Affairs) पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
ही समिती केंद्र सरकारच्या गृहनिर्माण, स्मार्ट सिटी, मेट्रो, पीएम स्वानिधी आणि केंद्र सरकारचा निधी असलेल्या अशा अनेक योजनांसह केंद्र सरकारच्या विविध योजनांवर सनियंत्रण (लक्ष) ठेवते.
खासदार इम्तियाज जलील यांची समितीवर तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. खासदार राजीव रंजन सिंह यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यात संजय सिंह, गौतम गंभीर, हेमा मालिनी, हिबी इडन हे देखील सदस्य आहेत.
.