BIGG BOSS 14 l ‘तुला थोबडवणार’….मराठी भाषेची चीड येते म्हणा-या जान कुमारला मनसेची धमकी

जान कुमार प्रसिध्द गायक कुमार सानूंचा मुलगा आहे

jaan-kumar-sanu-bigg-boss-about-marathi-language-mns-amey-khopkar-tweet
jaan-kumar-sanu-bigg-boss-about-marathi-language-mns-amey-khopkar-tweet

मुंबई : कलर्स वाहिनीवर बिग बॉसचा १४ वा सीझन सुरू आहे. Bigg Boss season 14 बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जानकुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषेची चीड येते, हिंदीत बोल अशा संदर्भातलं वक्तव्य जान कुमार सानूनं केलं आहे. यावर मनसेनं त्याला इशारा दिला आहे.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी याला मी नॉमिनेट करतोय, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

ट्विटमध्ये अमेय खोपकर म्हणतात की, मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं, असं देखील खोपकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा l  Bihar Elections 2020 : पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, आज ७१ जागांसाठी मतदान

बिग बॉस स्पर्धक Bigg Boss season 14 राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी यांच्या वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या वादादरम्यान राहुल वैद्यला बोलताना जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल काही आक्षेपार्ह शब्द उच्चारले.

दरम्यान, हा भाग प्रकाशित झाल्यानंतर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे. सध्या जान कुमार सानूचं वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here