Balasaheb Thackeray Death Anniversary | बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतीदिन, शिवतीर्थावर गर्दी न करण्याचे आवाहन

संयम पाळा, जेथे आहात तिथूनच मानवंदना द्या, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचे आवाहन

ShivSena founder Balasaheb Thackeray death anniversary
ShivSena founder Balasaheb Thackeray death anniversary

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांचा आज (17 नोव्हेंबर 2020) स्मृतीदिन. Balasaheb Thackeray Death Anniversary शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांच्या स्मृतीदिनी Balasaheb Thackeray Death Anniversary  त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी 11.30 वाजता सहकुटुंब छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी दाखल होतील.

यावेळी शिवसेना नेते आणि मंत्रीही उपस्थित रहाणार आहेत. कोविड 19 चा संसर्ग सुरू असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना मास्क आणि शारिरीक अंतर ठेवणं बंधनकारक असणार आहे. दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी अनेक शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होत आहे.

शिवसेनाप्रमुखांचे सर्वांच्या हृदयातील स्थान मला ठाऊक आहे

कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ‘शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन आहे. शिवसेनाप्रमुखांचे सर्वांच्या हृदयातील स्थान मला ठाऊक आहे. तुमच्या भावना आणि श्रद्धा मी समजू शकतो, पण यावेळी संयम पाळा.

मानवंदना द्यावी ही प्रत्येकाचीच भावना आहे पण

शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर येऊन त्यांना मानवंदना द्यावी ही प्रत्येकाचीच भावना आहे. पण तुम्ही जिथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या. शिस्त आणि नियमांचे पालन करा, हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरेल,’ अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा l  Buldhana Rape Case l बुलढाणा जिल्हयात अपंग मुलीवर बलात्कार

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here