राहुल गांधी ट्रॅक्टरवर स्वार होत शेतकऱ्यांसोबत संसदेत दाखल

मी शेतकऱ्यांचा संदेश संसदेत आणला आहे. सरकार शेतकर्‍यांचे आवाज दाबत आहेत आणि संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. त्यांना हे काळे कायदे रद्द करावे लागतील. संपूर्ण देशाला हे माहित आहे की हे कायदे २-३ बड्या उद्योजकांसाठी आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटलं.

laws-have-to-be-repealed-congress-leader-rahul-gandhi-rides-on-a-tractor-with-farmers-towards-parliament-news-update
laws-have-to-be-repealed-congress-leader-rahul-gandhi-rides-on-a-tractor-with-farmers-towards-parliament-news-update

नवी दिल्ली: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी Rahul Gandhi यांनी सोमवारी सकाळी दिल्लीच्या रस्त्यावर ट्रॅक्टर चालवत सर्वांना आश्चर्यचकित केले. कृषी कायद्याविरोधात farm Laws काँग्रेस पक्षाचे प्रदर्शन सुरूच असून याच भागात राहुल गांधी सोमवारी ट्रॅक्टर चालवून संसद भवनात पोहोचले. रणदीप सुरजेवाला, दीपेंदर हूडा आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधींबरोबर ट्रॅक्टरवर होते.

“मी शेतकऱ्यांचा संदेश संसदेत आणला आहे.  सरकार शेतकर्‍यांचे आवाज दाबत आहेत आणि संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. त्यांना हे काळे कायदे रद्द करावे लागतील. संपूर्ण देशाला हे माहित आहे की हे कायदे २-३ बड्या उद्योजकांसाठी आहेत” असे राहुल गांधी यांनी म्हटलं.

“सरकारच्या मते शेतकरी खूप आनंदात आहेत आणि बाहेर बसलेले (निषेध करणारे शेतकरी) अतिरेकी आहेत. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे हक्क हिसकावले जात आहेत,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत जंतर-मंतर येथे किसान संसद सुरु आहे. २०० शेतकरी दररोज जंतर-मंतर येथे सहभागी होत आहेत. हे आंदोलन संसदेच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत सुरू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here