Aurangabad Crime Story 2023: गुन्हे उघडकीस आणण्यात औरंगाबाद शहर पोलिस दल अव्वल!

Aurangabad city police force tops in uncovering crimes!
Aurangabad city police force tops in uncovering crimes!

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात (Aurangabad City Crime 2023) वर्षभरात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. यंदा एकूण ५ हजार ६९ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ४ हजार ५४७ गुन्हे उघडकीस आणण्यात शहर पोलिस दलाला यश मिळाले. २०२३ मधील गुन्हांचा लेखाजोखा पोलिसांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. पोलिस दलाच्या एकुण कामगिरीवर व शहरातील शांततेबाबत पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी समाधान व्यक्त केले.Aurangabad city police force tops in uncovering crimes

महिलांविषयीच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात यावर्षी वाढ झाली. त्याच प्रमाणे न्यायालयात प्रकरण निकाली निघून शिक्षेच्या प्रमाणातदेखील यंदा घट झाली आहे. शहरात पोलिसांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, दोन वर्षाच्या तुलनेत यंदा विविध गंभीर गुन्ह्यांत वाढ झाली. मात्र उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, बलात्कार, दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल झाले आणि ते बऱ्यापैकी उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना यश आले. मात्र, जबरी चोरी, चोरी, घरफोडी, वाहनचोरी, मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांमध्ये दोन वर्षांच्या तुलनेत वाढ झाली असून ते उघडकीस आणण्याच्या प्रमाणात घट झाली.

एकूण सर्व प्रकारच्या १,४८० चोरीचे प्रकार वर्षभरात घडले. यातील केवळ ५२७ गुन्हे उघडकीस आले. वर्ष २०२१ मध्ये जबरी चोरीचे ११४ गुन्हे दाखल झाले असून ९१ गुन्हे उघडकीस आले आहेत. २०२२ मध्ये १३२ जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून ११९ गुन्हे उघडकीस आले. तसेच २०२२ मध्ये घरफोडीचे १३८ गुन्हे दाखल झाले असून ५० गुन्हेच उघडकीस आणण्यामध्ये यश आले आहे. वाहन चोरीचे गुन्हे २०२१ मध्ये ९२० दाखल झाले

असून २०२२ मध्ये ९२५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त नितीन बगाटे, नवनीत कावत, अपर्णा गिते, गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक संदीप गुरमे, निर्मला परदेशी आदींची पत्रपरिषदेला उपस्थिती होती.

महिलांविषयीच्या गुन्ह्यांत वाढ

महिलांविषयीच्या गुन्ह्यात यावर्षी वाढ झाली. २०२१ मध्ये एकूण गुन्हे ७४५ दाखल करण्यात आले होते तर वर्ष २०२२ मध्ये ८२९ गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०२३ मध्ये ही संख्या ९४२ झाली आहे.

जुगार, दारु, अमली पदार्थ, एमपीडीएच्या कारवाईत दिलासा

शहर पोलिसांना गुन्हे उघडकीस आणण्यात अपयश आले असले तरी जुगार, अमली पदार्थ विक्रीविरोधी तसेच दारुबंदीच्या गुन्ह्याच्या कारवाईत वाढ झाली आहे. झोपडपट्टी दादा कायदा (एमपीडीए) अंतर्गत एकूण १८ गुन्हेगारांना हर्सूल कारागृहात स्थानबलध्द करण्यात आले आहे.

शिक्षेची टक्केवारी घसरली

जिल्हा सत्र न्यायालय तसेच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात निकाली लागलेल्या खटल्याच्या शिक्षेत दोन वर्षांच्या तुलनेत यंदा घट झाली. २०२१ मध्ये दोन्ही न्यायालयात एकूण २,२८८ निकाल लागले होते. यापैकी ४९६ प्रकरणांत शिक्षा झाल्या असून याचे प्रमाण २२ टक्के होते. २०२३ मध्ये २,१०५ निकाल लागले असून ४०५ प्रकरणांत शिक्षा झाल्या आहेत. २०२३ मध्ये १,९२६ निकाल लागले असून केवळ २२८ जणांना शिक्षा लागली आहे, याचे प्रमाण १२ टक्के आहे.

काही घटनांचा तपास लवकर लागतो कधी अडचणी येतात…शहरात चोरी, घरफोडी, वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यंदा शहर पोलिस काही प्रमाणात कमी पडले आहेत. मात्र, इतर गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलेले आहे. कधी कधी गुन्हे लवकर उघडकीस येतात. काही ठिकाणी अडचणी गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात वाढ करण्यासंदर्भात कडक सूचना करण्यात आल्या आहेत. – मनोज लोहिया, पोलिस आयुक्त

जबरी चोरी

दाखल गुन्हे 184

उघड 138

घरफोडी

दाखल गुन्हे 140

उघड 42

दिवसा घरफोडी

दाखल गुन्हे 32

उघड 11

रात्री घरफोडी

दाखल गुन्हे 108

उघड 31

सर्व चोऱ्या

दाखल गुन्हे 1480

उघड 527

मंगळसूत्र चोरी

दाखल गुन्हे 57

उघड 31

वाहन चोरी

दाखल गुन्हे 896

उघड 285

मोबाईल चोरी

दाखल गुन्हे 118

उघड 3

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here