MPSC Recruitment 2022 l महाराष्ट्र लोकसेवा आयोगात नोकरीची संधी

भरतीची प्रक्रिया ७ जानेवारी २०२२ पासून सुरु झाली असून २७ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे.

MPSC's decision to implement new syllabus from 2025 welcome: Atul Londhe
MPSC's decision to implement new syllabus from 2025 welcome: Atul Londhe

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) रिक्त पदांसाठी भरती करण्यास सुरुवात केली आहे. mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार सहाय्यक लोक अभियोजक, गट अ पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या रिक्त जागांची संख्या ५४७ इतकी आहे. भरतीची प्रक्रिया ७ जानेवारी २०२२ पासून सुरु झाली असून २७ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे.

ज्यांनी कायद्यामध्ये पदवी घेतली आहे असे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांचे वय हे १८ ते ३८ वर्ष असावे. आरक्षण श्रेणीतील उमेदवारांना नियमांमधून सूट मिळेल. व्यक्तिगत मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. अनारक्षित वर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क ७१९ रुपये तर आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क ४४९ रुपये आहे.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेसाठी कर्ज कसा करावा ?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ mpsc.gov.in वर जावे.

स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे.

विनंती केलेली माहिती भरावी आणि अर्ज भरावे.

अर्ज शुल्क भरावे.

अर्जाची एक प्रत डाउनलोड करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here