Maharashtra SET Result : महाराष्ट्र SET परीक्षेचा निकाल जाहीर, वाचा एका क्लिकवर

maharashtra-set-exam-results-declared-5-thousand-297-students-passed-the-set-exam-news-update
maharashtra-set-exam-results-declared-5-thousand-297-students-passed-the-set-exam-news-update

मुंबई: महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर झाला (SET Result Declared) आहे. 5 हजार 297 विद्यार्थी सेट परीक्षेत उत्तीर्ण (Set Exam result list) झाले आहेत. ही परीक्षा 26 सप्टेंबर रोजी पार पडली होती, एकूण 79 हजार 774 उमेदवार परीक्षेला बसले होते.

मुंबई आणि पुणे शहरात तुलनेने उमेदवारांची उपस्थिती कमी असल्याचे पाहायला मिळाले. पात्र झाल्याचे ई-प्रमाणपत्र उमेदवारांना 4 फेब्रुवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संकेतस्थळावर आपल्या लॉगीनवर जाऊन उमेदवारांना प्रमाणपत्र मिळेल, अशी माहिती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे काम आणखी सोपे झाले आहे, विद्यार्थ्यांना घरबसल्या निकाल पाहता येणार आहे.

येथे पाहा निकाल

https://setexam.unipune.ac.in

असा पाहा निकाल

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट http://setexam.unipune.ac.in/ वर जा. या नंतर MH SET निकालाच्या लिंक वर क्लिक करा. यानंतर नवी विंडो स्क्रीन पर दिसेल. यानंतर ड्रॉप डाउन मधून MH SET परीक्षेची तारीख निवडा. यानंतर आवश्यक ती माहिती भरून सबमीट करा आणि निकाल डाऊनलोड करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here