Mumbai Building Collapsed l वांद्रयात इमारतीचा भाग कोसळला; एक ठार, सात जखमी

mumbai-building-collapsed-bandra-east-brihanmumbai-municipal-corporation-fire-brigade-team-mla Zeeshan Siddique-news-update
mumbai-building-collapsed-bandra-east-brihanmumbai-municipal-corporation-fire-brigade-team-mla Zeeshan Siddique-news-update

मुंबई l मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात बेहराम पाडा भागात एका चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला. रात्री दोन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेत एका जणाचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. ११ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून, त्यांना वांद्रे पूर्वमधील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.Mumbai-building-collapsed-bandra-east-brihanmumbai-municipal-corporation-fire-brigade-team-mla-Zeeshan-Siddique-news-update

वांद्रे पूर्व परिसरात येणाऱ्या बेहराम पाडा भागात रात्री ६ जून दोन वाजता इमारतीचा काही भाग कोसळला. बेहराम पाडातील चार मजली रज्जाक चाळ आहे. चार मजली इमारतीत छताचा भाग कोसळून ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

.

हेही वाचा : Twitter मोदींच्या राजकीय प्रचाराचा आत्मा होता, आता भाजपचा विरोध का?;शिवसेनेचा सवाल

दुर्घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचाव कार्य हाती घेण्यात आलं. जवळपास ११ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून, त्यांना वांद्रे पूर्वमधील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा : Trains Accident  Pakistan : पाकिस्तान में 2 पैसेंजर ट्रेनें टकराईं; 30 की मौत, 50 से ज्यादा लोग घायल

या दुर्घटनेत मृत्यू झालेली व्यक्ती मूळची बिहारची होती. एका महिलेच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, तिला टाके पडले आहेत. तर इतर जण किरकोळ जखमी झाले आहेत. इमारत कोसळल्यानं मोठा माती आणि विटांचा ढिगारा पडला आहे. तो हटवण्याचं काम महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडून करण्यात आलं आहे, अशी माहिती सिद्धीकी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here